IPL 2026 : सनरायझर्सच्या फलंदाजांवर मोठी भिस्त; केकेआरविरुद्ध आज भिडणार (Photo-khelnow)
क्रीडा

IPL 2026 : सनरायझर्सच्या फलंदाजांवर मोठी भिस्त; केकेआरविरुद्ध आज भिडणार

रविवारी होणाऱ्या आयपीएल सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा संघ विजयी मालिका कायम राखण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध मैदानात उतरणार आहे.

Swapnil S

हैदराबाद : रविवारी होणाऱ्या आयपीएल सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा संघ विजयी मालिका कायम राखण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध मैदानात उतरणार आहे. सनरायझर्सचा संघ ९ सामन्यांतून १२ गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर असून, त्यात ६ विजय आणि ३ पराभवांचा समावेश आहे.

सनरायझर्सकडे अभिषेक शर्मा आणि हेन्रिच क्लासेन यांच्यासारखे आक्रमक फलंदाज आहेत. याव्यतिरिक्त इशान किशन आणि ट्रेव्हिस हेड यांनीही चांगली कामगिरी केली आहे. हेडने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या मागील सामन्यात ७६ धावा केल्या होत्या. नितीश कुमार रेड्डी आणि सलिल अरोरा यांनीही मोक्याच्या क्षणी योगदान दिले आहे. कर्णधार पॅट कमिन्स याच्या पुनरागमनामुळे संघाची गोलंदाजी बळकट झाली असून, प्रफुल हिंगे, इशान मलिंगा, रेड्डी आणि साकिब हुसेन यांनीही चांगली कामगिरी केली आहे. याआधी पहिल्या टप्प्यात सनरायझर्सने केकेआरचा ६५ धावांनी पराभव केला होता.

कोलकाता नाईट रायडर्सचा संघ अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली संघर्ष करत असून, गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे. केकेआरने सलग दोन सामने जिंकले असले तरी रहाणेच्या नेतृत्वाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. संघात रचिन रविंद्र, फिन अॅलन आणि टिम सेइफर्ट यांना संधी मिळणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच अंगरिक्ष रघुवंशी, कॅमेरॉन ग्रीन आणि रोवमन पॉवेल यांना अद्याप आपली छाप पाडता आलेली नाही. संघाची गोलंदाजी वरूण चक्रवर्ती, अनुकुल रॉय, वैभव अरोरा आणि कार्तिक त्यागी यांसारख्या खेळाडूंवर अवलंबून आहे.

सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात आतापर्यंत आयपीएलमध्ये ३१ सामने झाले असून त्यापैकी सनरायझर्सला फक्त ११ सामन्यांत विजय मिळवता आला आहे तर कोलकाताने २० लढती जिंकल्या आहेत.

कोलकाताच्या अंगरिक्ष रघुवंशी याला टी-२० क्रिकेटमध्ये १ हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी अजून ७धावा हव्या आहेत. तसेच टी-२०मध्ये १०० चौकार लगावण्यासाठी त्याला २ चौकारांची आवश्यकता आहे.

खेळपट्टीवर धावांची बरसात

आयपीएल २०२६ मध्ये आतापर्यंत हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर चार सामने खेळवण्यात आले आहेत. या सामन्यांमध्ये पहिल्या डावाची सरासरी धावसंख्या २०२ राहिली आहे. संपूर्ण ४० षटके खेळपट्टी फलंदाजीसाठी उत्तम राहत असल्याने, प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला २०० हून अधिक धावांचे लक्ष्य ठेवावे लागेल.

प्रतिस्पर्धी संघ

सनरायजर्स हैदराबाद : इशान किशन (कर्णधार), पॅट कमिन्स, ट्रेव्हिस हेड, रविचंद्रन स्मरण, सलिल अरोरा, हेनरिच क्लासेन, अनिकेत वर्मा, अभिषेक शर्मा, हर्ष दुबे, लियाम लिव्हिंगस्टोन, नितीश रेड्डी, शिवम मावी, क्रेन्स फुलेत्रा, कामिंदू मेंडिस, हर्षल पटेल, शिवांग कुमार, अमित कुमार, प्रफुल्ल हिंगे, इशान मलिंगा, साकिब हुसैन, ओमकार तरमाळे, जयदेव उनादकट, झीशान अन्सारी, दिलशान मदुशंका, जेराल्ड कोएट्झे.

कोलकाता नाइट रायडर्स : अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, फिन अॅलन, तेजस्वी दहिया, मनीष पांडे, अंक्रिश रघुवंशी, रमणदीप सिंग, रोवमन पॉवेल, सार्थक रंजन, टिम सेईफर्ट, राहुल त्रिपाठी, दक्ष कामरा, सुनील नरिन, अनुकुल रॉय, कॅमेरून ग्रीन, रचिन रवींद्र, वैभव अरोरा, ब्लेसिंग मुझरबानी, प्रशांत सोलंकी, वरुण चक्रवर्ती, सौरभ दुबे, कार्तिक त्यागी, मथीशा पाथिराना, उमरान मलिक, नवदीप सैनी.

वेळ : दुपारी ३.३० वाजता

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी आणि जिओहॉटस्टार अॅप

Thane : व्यावसायिक सिलिंडर दरवाढीमुळे उद्योग संकटात; खानावळी, छोटे स्टॉलधारक, पोळीभाजी केंद्रांचे गणित बिघडले

Pune : नसरापूर ४ वर्षीय चिमुरडी अत्याचार-हत्या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे कोण? पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर

दिल्लीतील विवेक विहारमधील चार मजली इमारतीला भीषण आग; ९ जणांचा होरपळून मृत्यू

Mumbai : आता उद्यानांमध्ये मातांसाठी स्तनपान कक्ष; आराखडा तयार, विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीत समावेश करणार

मुंबईतील तीन महाविद्यालयांचा निकाल शून्य टक्के; सात महाविद्यालयांमधील काही शाखांचा निकाल शून्य टक्के