मिचेल स्टार्क IPL/X
क्रीडा

IPL 2027 Retention : स्टार्क, मुस्तफिझूर, ट्रेव्हिस हेड संघातून मुक्त

पुढील महिन्यात होणाऱ्या आयपीएल खेळाडूंच्या लिलावापूर्वी ऑस्ट्रेलियाचा आघाडीचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आणि सलामीवीर ट्रॅव्हिस हेड यांच्यासह अनेक नामांकित खेळाडूंना त्यांच्या संबंधित फ्रँचायझींनी मंगळवारी संघातून मुक्त केले.

Swapnil S

नवी दिल्ली : पुढील महिन्यात होणाऱ्या आयपीएल खेळाडूंच्या लिलावापूर्वी ऑस्ट्रेलियाचा आघाडीचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आणि सलामीवीर ट्रॅव्हिस हेड यांच्यासह अनेक नामांकित खेळाडूंना त्यांच्या संबंधित फ्रँचायझींनी मंगळवारी संघातून मुक्त केले. यामध्ये बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिझूर रहमानचा समावेश आहे.

दिल्ली कॅपिटल्सने मिचेल स्टार्कला मुक्त केले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या कार्यभार व्यवस्थापन धोरणामुळे स्टार्कला आयपीएल २०२६ च्या पहिल्या टप्प्यात खेळता आले नव्हते. दिल्लीने त्याला ११.७५ कोटी रुपयांना खरेदी केले होते. आयपीएल २०२७ मध्ये त्याच्या उपलब्धतेबाबतही प्रश्नचिन्ह होते. दिल्ली कॅपिटल्सने एकूण १० खेळाडूंना मुक्त केले. त्यामध्ये नितीश राणा, अभिषेक पोरेल, बेन डकेट, दुश्मंथा चामिरा आणि करुण नायर यांचाही समावेश आहे.

ट्रेव्हिस हेडने आयपीएल २०२७ मधून माघार घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे सनरायझर्स हैदराबादने त्याला संघातून मुक्त केले. सलामीवीर म्हणून खेळण्यासाठी हैदराबादकडून त्याला १४ कोटी रुपये मिळत होते. सनरायझर्स हैदराबादने हेडसह एकूण नऊ खेळाडूंना मुक्त केले. त्यामध्ये जेराल्ड कोएत्झी आणि जयदेव उनाडकट यांचाही समावेश आहे.

मंगळवारी खेळाडू कायम ठेवण्याची प्रक्रिया संपल्यानंतर मुंबई इंडियन्सचा ट्रेंट बोल्ट, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा जेकब बेथेल आणि राजस्थान रॉयल्सचा शिम्रॉन हेटमायर या परदेशी खेळाडूंनाही संघातून मुक्त करण्यात आले.

मुंबई इंडियन्सने एकूण नऊ खेळाडूंना मुक्त करून आपल्या लिलावाच्या रकमेत २८.८ कोटी रुपयांची भर घातली. ट्रेंट बोल्टसह दीपक चाहर आणि ए.एम. गझनफर यांनाही संघातून सोडण्यात आले.

कॅमेरून ग्रीन कायम

कोलकाता नाइट रायडर्सने २५.२० कोटी रुपयांच्या कॅमेरून ग्रीनला संघात कायम ठेवले. कोलकाताने एकूण १२ खेळाडूंना मुक्त केले. त्यामध्ये आता निवृत्त झालेला अजिंक्य रहाणे, रचिन रवींद्र आणि आकाशदीप यांचा समावेश आहे.

Mumbai: २० ‌विभागांचा निधी दिवाबत्तीसाठी; रस्त्यांवरील दिवाबत्तीची ५४.८० कोटींची थकबाकी, चालू आर्थिक वर्षातील तरतूदही अपुरी

वेतनश्रेणीच्या मागणीसाठी न्यायालयीन कामकाज ठप्प; संपात राज्यातील सुमारे ३४ हजार न्यायालयीन कर्मचारी सहभागी

भटक्या कुत्र्यांवर उपाययोजना करा! न्यायालयाचे मुंबई महापालिकेला आदेश

Thane : 'बाळासाहेब असते, तर त्याच रात्री न्याय मिळाला असता'; कापूरबावडी पोलीस ठाण्याबाहेर बॅनर

ठाणे पोलीस आयुक्तांचे व्हॉट्सॲप खाते हॅक; स्टेट्सवर २० अश्लील चित्रफिती