क्रीडा

IPL 2025 : जयपूरमध्ये आज RR vs RCB सामना; दोन्ही संघ विजयी मार्गावर परतण्यासाठी प्रयत्नशील

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात विजयी मार्गावर परतण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नशील आहेत.

Krantee V. Kale

जयपूर : आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आज (दि. १३, रविवारी) आमनेसामने येणार आहेत. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात विजयी मार्गावर परतण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नशील आहेत.

दोन्ही संघांना गत सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. दिल्लीने आरसीबीला ६ विकेट्सने धूळ चारली आहे. दुसरीकडे गुजरात टायटन्सने राजस्थानला ५८ धावांनी मात दिली. बंगळुरूने ५ सामन्यांपैकी ३ सामन्यांत बाजी मारली आहे. गुणतालिकेत ते चौथ्या स्थानी आहेत. राजस्थानला तुलनेत कमी विजय मिळवता आले आहेत. हा संघ सातव्या स्थानी आहे.

जोफ्रा आर्चरचे आव्हान

हंगामातील सलामीच्या लढतीत वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर कमालीचा महागडा ठरला होता. मात्र त्यानंतर त्याने आपल्या कामगिरीत सुधारणा केली. त्याने पंजाबविरुद्धच्या लढतीत त्याने ३/२५ असा लक्षवेधी स्पेल टाकला. फॉर्मात असलेल्या श्रेयस अय्यरचा त्रिफळा १४८.६ च्या प्रति ताशी वेगाने उडवल्यावर आर्चर प्रकाशझोतात आला. याच आठवड्यात त्याने गुजरातविरुद्धच्या लढतीत १५२.३ प्रति ताशी वेगाने चेंडू टाकला. त्यामुळे बंगळुरूचे सलामीवीर फिल सॉल्ट आणि विराट कोहली यांच्यासह संघापुढे वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचे आव्हान आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, यश दयाल, अभिनंदन सिंग, भुवनेश्वर कुमार, देवदत्त पडिक्कल, जेकब बिथेल, जितेश शर्मा, जोश हेझलवूड, कुणाल पंड्या, लियाम लिव्हिंगस्टोन, लुंगी एन्गिडी, मनोज भडांगे, मोहित राठी, नुवान थुशारा, फिल सॉल्ट, रसिक डार, रोमारिओ शेफर्ड, सूयश शर्मा, स्वप्निल सिंग, स्वस्तिक चिकारा, टिम डेव्हिड.

राजस्थान रॉयल्स

संजू सॅमसन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, रियान पराग, शिम्रॉन हेटमायर, संदीप शर्मा, आकाश मढवाल, अशोक शर्मा, फझलहक फारुकी, जोफ्रा आर्चर, कुमार कार्तिकेय, कुणाल राठोड, क्वेना माफका, महीष थिक्षणा, नितीश राणा, शुभम दुबे, तुषार देशपांडे, वैभव सूर्यवंशी, वानिंदू हसरंगा, युधविर चरक.

वेळ : दुपारी ३.३० वाजल्यापासून

थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स १ हिंदी आणि जिओहॉटस्टार अॅप

सणासुदीत पारंपरिक पेहरावाची क्रेझ; पंजाबी सूट, अनारकली अन् एथनिक गाऊन ठरतोय हिट

अंबानींच्या गणेशोत्सवात सेलिब्रिटींची मांदियाळी; आलिया-रणबीर, कियारा-सिद्धार्थसह स्टार कपल्सच्या फॅशनची चर्चा

गणेशोत्सवासाठी जिनिलीयाचा मराठमोळा लूक; साडीपासून दागिन्यांपर्यंत सगळंच सुंदर, एकदा फोटो पाहाच

Gurugram Hit-and-Run : महिला बाईक रायडरला कारची जोरदार धडक; फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद

Mumbai : मेट्रो ९ टप्पा २ साठी विशेष वाहतूक ब्लॉक; १५ ते २५ सप्टेंबर दरम्यान सकाळी वाहतूक उशीरा सुरू होणार