क्रीडा

गुणवत्ता दाखविण्यासाठी कष्ट करणे इतकेच माझ्या हातात - दीपक चहर

झिम्बाब्वे दौऱ्यावर दीपक चहरने जोरदार पुनरागमन केले. गेल्या सहा महिन्यांपासून मांडीचा स्नायू दुखावल्यामुळे तो संघाबाहेर होता

वृत्तसंस्था

‘टी-२० वर्ल्डकपसाठी माझी निवड होईल की नाही हे मी सांगू शकत नाही. ते माझ्या हातात नाही. माझ्या हातात फक्त माझी गुणवत्ता दाखविण्यासाठी कष्ट करणे इतकेच आहे. मला वाटते की मी जेथून सोडून गेलो होतो तेथूनच सुरूवात केली आहे,’ असे मत भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चहरने व्यक्त केले.

झिम्बाब्वे दौऱ्यावर दीपक चहरने जोरदार पुनरागमन केले. गेल्या सहा महिन्यांपासून मांडीचा स्नायू दुखावल्यामुळे तो संघाबाहेर होता; मात्र दुसऱ्या सामन्यात त्याला विश्रांती देण्यात आली. पहिल्या सामन्यात २७ धावांच्या मोबदल्यात तीन विकेट घेतल्याने तो ‘प्लेयर ऑफ द मॅच’ ठरला होता. दुसऱ्या सामन्यात त्याच्या जागेवर शार्दूल ठाकूरला संधी देण्यात आली.

टी-२० वर्ल्डकप संघाचे दार तुझ्यासाठी उघडले आहे का, असे विचारले असता दीपक म्हणाला की, ‘केवळ मी माझ्या कामगिरीवरच स्वत:ला सिद्ध करून दाखवू शकतो. निवड वगैरे गोष्टी माझ्या हातात नाहीत.’

तो म्हणाला की, ‘पहिल्या सामन्यात पहिली दोन षट्के सोडली तर मी चांगली गोलंदाजी केली. मी एका दमात सात षट्के टाकली हा माझा फिटनेस स्तर दमदार असल्याचा संकेत आहे.’ पहिल्या वन-डे सामन्यात त्याने २७ धावा देत तीन विकेट्स घेतल्यामुळे दीपकला मोठ्या ब्रेकनंतर फॅन्सचा मोठा पाठिंबा मिळाला. तो म्हणाला, ‘वन-डे आणि कसोटी क्रिकेटमध्ये प्रोत्साहित करण्यासाठी लोकांची गर्दी असणे खूप गरजेचे असते. झिम्बाब्वेमध्ये इतकी गर्दी पाहून मला खूप आनंद झाला आहे. कोरोना काळात आम्ही ही गोष्ट खूप मिस करत होतो.' दीपकची झिम्बाब्वेमध्ये फॅन फॉलोईंग जबरदस्त वाढली आहे. स्थानिक पत्रकार, सुरक्षारक्षक, ग्राऊंड स्टाफची चहलसोबत सेल्फी घेण्यासाठी झुंबड उडली होती. झिम्बाब्वे संघातील क्रिकेटपटूच्या कुटुंबाला देखील दीपक चहरसोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

‘बटेंगे तो कटेंगे’, ओबीसीने भाजपला तारले