क्रीडा

जॉनी बेअरस्टोच्या पायाला तीन ठिकाणी फ्रॅक्चर

गोल्फ खेळताना तोल सांभाळण्याच्या प्रयत्नात खाली पडून डाव्या पायाला दुखापत होऊन घोट्याला जबर मार लागला

वृत्तसंस्था

इंग्लंड क्रिकेट संघाचा यष्टिरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टो हा दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषक मालिकेमधून बाहेर गेला आहे. त्याच्या पायाला तीन जाग्यावर फ्रॅक्चर झाले आहे. याची माहिती बेअरस्टोने स्वत: सोशल मीडियावर पायाचे फोटो शेअर करत दिली आहे. वर्ल्डकप संघात निवड झाली असताना त्याला ही दुखापत गोल्फ खेळताना झाली. त्यामुळे इंग्लंडला आपल्या वर्ल्डकप संघात बदल करावा लागला होता. आता तो २०२३पर्यंत फिट होणार नाही, असे संकेत मिळत आहेत.

बेअरस्टोने सांगितले की, एका महिन्यापूर्वी गोल्फ खेळताना तोल सांभाळण्याच्या प्रयत्नात खाली पडून डाव्या पायाला दुखापत होऊन घोट्याला जबर मार लागला होता. पायाला तीन ठिकाणी फ्रॅक्चर झाले होते. तेथे प्लेट लावाव्या लागल्या. दुखापतीनंतर सुमारे एका आठवड्याने पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

Maratha Reservation: आंदोलनाची धग वाढणार; मनोज जरांगे आजपासून पाणी पिणेही बंद करणार; एकतर विजययात्रा, नाहीतर अंत्ययात्रा

Maratha Reservation : दक्षिण मुंबईत आज पुन्हा कोंडीची शक्यता

शिक्षण क्षेत्रातील विषमता आणि आंबेडकर

राक्षसी बहुमतापेक्षा मोठी जनशक्ती

सप्टेंबर महिना कसा जाईल? बघा मेष आणि वृषभ राशीचे भविष्य