न्यूझीलंडचा फलंदाज केन विल्यम्सनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा (Photo- FPJ)
क्रीडा

न्यूझीलंडचा फलंदाज केन विल्यम्सनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा

न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज केन विल्यम्सनने शुक्रवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

Swapnil S

ख्राईस्टचर्च : न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज केन विल्यम्सनने शुक्रवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. सातत्य, उत्कृष्ट तंत्र आणि अनुकरणीय नेतृत्वासाठी ओळखल्या जाणाऱ्या विल्यम्सनच्या या घोषणेमुळे त्याच्या १६ वर्षांच्या गौरवशाली आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा पडदा पडला आहे.

न्यूझीलंडचा आजवरचा सर्वात महान फलंदाज मानल्या जाणाऱ्या विल्यम्सनने आपल्या देशासाठी ३७८ सामने खेळले. यादरम्यान त्याने फलंदाजीचे असंख्य विक्रम प्रस्थापित केले आणि क्रिकेट जगतात आदर व कौतुक मिळवले. यापूर्वी २०२५ मध्ये त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बाजूला होण्याचा निर्णय घेतला होता.

न्यूझीलंड क्रिकेटने जारी केलेल्या निवेदनात ३५ वर्षीय विल्यम्सनने म्हटले आहे की, मी काही काळापासून याचा विचार करत होतो. पण गेल्या काही दिवसांत निवृत्तीसाठी हीच योग्य वेळ असल्याचे स्पष्ट झाले आहे. मला आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी नेहमीच तीव्र ओढ आणि भूक होती. न्यूझीलंडसाठी खेळलेल्या प्रत्येक सामन्यात मी माझे सर्वस्व दिले याचा मला अभिमान वाटतो. स्वतःच्या अटींवर बाजूला होताना मला सुदैवी वाटत आहे.

विल्यम्सनने न्यूझीलंडसाठी सर्व फॉरमॅटमध्ये मिळून सर्वाधिक १९,३४६ धावा केल्या आहेत. यात कसोटी क्रिकेटमधील ९,५०० हून अधिक धावांचा समावेश असून त्याने ३३ शतके आणि ६ द्विशतके झळकावली आहेत.

सर्व फॉरमॅटचा विचार केला तर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ४८ शतके आणि ६ द्विशतके ठोकली आहेत. त्याच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडच्या संघाने दोनवेळा विश्वचषकाची अंतिम फेरी आणि तीनवेळा उपांत्य फेरी गाठली होती. तसेच २०२१ मधील पहिल्यावाहिल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचे (डब्ल्यूटीसी) विजेतेपदही पटकावले होते.

राज्यातील २६५ तालुक्यांत कोरडा दुष्काळ जाहीर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

'लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी एकत्र या'; SIR विरोधात ४ ऑक्टोबरला मुंबईत जनमोर्चा, राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत

सोनं-दागिने दाखवत बनवायची Reel; चोरट्यांनी VIDEO पाहून साधली संधी, घरातून १ कोटींचा ऐवज लंपास

यवतमाळमध्ये वेल्डिंग करताना भीषण स्फोट; दोघांचा जागीच मृत्यू, ५ जण गंभीर जखमी, Video

नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसवर दगडफेक; खिडक्यांच्या काचा फुटल्या, Video व्हायरल