एक्स @mansukhmandviya
क्रीडा

क्रीडामंत्र्यांकडून विश्वविजेत्यांचा सन्मान; भारताच्या खो-खो संघांनी घेतली मनसुख मांडविया यांची भेट

केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मंडविया यांनी बुधवारी भारताच्या दोन्ही विश्वविजेत्या खो-खो संघांची नवी दिल्ली येथे भेट घेतली.

Swapnil S

नवी दिल्ली : केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मंडविया यांनी बुधवारी भारताच्या दोन्ही विश्वविजेत्या खो-खो संघांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. विश्वचषकातील यशानंतर आता खो-खो राष्ट्रकुल आणि ऑलिम्पिक स्पर्धेतील समावेशासाठी सज्ज असल्याचे यावेळी मांडविया म्हणाले.

महाराष्ट्राच्या मातीतील खो-खो हा खेळ आता नव्या रंगात, नव्या ढंगात जगभरात झेप घेत आहे. गेल्या काही वर्षांपासून खो-खो झपाट्याने भरारी घेत आहे. राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पातळीवरील खो-खो स्पर्धांना दर्दी क्रीडाप्रेमी नेहमीच गर्दी करतात. त्यानंतर अनुक्रमे पुणे आणि ओदिशा येथे मॅटवर झालेल्या अल्टिमेट खो-खो लीगच्या दोन पर्वांनाही चाहत्यांचा दमदार प्रतिसाद लाभला. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये केकेएफआयने खो-खोच्या पहिल्या विश्वचषकाची घोषणा केली. गेला आठवडाभर नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय इनडोअर स्टेडियममध्ये खो-खो विश्वचषकाचा दुहेरी थरार पार पडला. या विश्वचषकात एकंदर सहा खंडांतील २३ देश सहभागी झाले होते. पुरुष व महिला अशा दोन्ही गटांत मिळून ३९ संघांत ही स्पर्धा खेळवण्यात आली. भारताने दुहेरी जेतेपद मिळवताना अंतिम फेरीत नेपाळवर वर्चस्व गाजवले.

दरम्यान, भारताचे खो-खो संघ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही भेटणार असल्याचे समजते. याविषयी अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही. तसेच २०३०चे आशियाई आणि २०३२च्या ऑलिम्पिकमध्ये खो-खोचा समावेश करण्यासाठी भारतीय महासंघ प्रयत्नशील आहे, असे महासंघाचे अध्यक्ष सुधांशू मित्तल यांनी जाहीर केले. २०२७मध्ये पुढील विश्वचषक इंग्लंडला रंगणार आहे.

बोलणी फिस्कटली; आंदोलन सुरूच! मनोज जरांगे-शिंदे समिती यांच्यातील चर्चा निष्फळ, हैदराबाद गॅझेट लागू करण्यास सरकारची तत्त्वतः मंजुरी

रेल्वे स्टेशनमध्ये दोन दिवस राहा फक्त दहा रुपयांत...आंदोलकांच्या व्हॉट्सअपवर मेसेज व्हायरल, वाशीतील एक्झिबिशन सेंटरमध्ये व्यवस्था

मराठा आंदोलकांनी केला चक्काजाम; जरांगे-पाटील यांच्या आवाहनानंतर रस्ता मोकळा

इशाऱ्यानंतर पालिका प्रशासनाचे नमते! फिरत्या शौचालयासह पुरवल्या इतर सुविधा; आंदोलकांसाठी पाण्याचे टँकर्सही अखेर उपलब्ध

Maratha Reservation Protest : मुंबईच्या रस्त्यांवर संगीत, नृत्य आणि कठपुतळीचा नाचही!