क्रीडा

कोहलीची विराट कमाई, एकूण मालमत्ता १ हजार कोटींपेक्षाही जास्त

इन्स्टाग्रामवर विराटच्या एका पोस्टची किंमत ८.९ कोटी रुपये आहे. ट्विटरवर एका पोस्टसाठी त्याला २.५ कोटी रुपये मिळतात

नवशक्ती Web Desk

भारताचा भरवाशाचा फलंदाज विराट कोहली विविध कारणांमुळे नेहमीच चर्चेत असतो. आता त्याच्या विराट कमाईमुळे कोहलीची सगळीकडे चर्चा सुरू आहे. विराटची एकूण कमाई १ हजार कोटींपेक्षाही अधिक असल्याचे समोर आले आहे.

विराटचे सोशल मीडियावर कोट्यवधी फॉलोअर्स आहेत. त्याच्या इन्स्टाग्रामवर २५२ आणि ट्विटरवर ५६.४ मिलियन फॉलोअर्स आहेत. विराट कोहली सोशल मीडियाच्या माध्यमातून कोट्यवधींची कमाई करतो. इन्स्टाग्रामवर विराटच्या एका पोस्टची किंमत ८.९ कोटी रुपये आहे. ट्विटरवर एका पोस्टसाठी त्याला २.५ कोटी रुपये मिळतात. कोहलीचे सध्याचे नेटवर्थ १,०५० कोटी असल्याचे समजते.

विराटला बीसीसीआयकडून दर वर्षाला ७ कोटींचे मानधन दिले जाते. एका टेस्ट मॅचसाठी तो तब्बल १५ लाख, ओडीआयसाठी ६ लाख, टी-२० सामन्यासाठी ३ लाख रुपये फी घेतो. त्याशिवाय आयपीएलमधून कोहलीची वर्षाला १५ ते १७ कोटींची कमाई होती. कोहलीचे दोन व्यवसाय असून यामध्ये वन८ हे रेस्टॉरंट आणि व्रॉगन या कपड्यांच्या ब्रँडचा समावेश आहे. कोहलीची व्हिवो, मिंत्रा, एमआरएफ या कंपनीशी गुंतवणूक असून तो फुटबॉल, टेनिस संघाचाही मालक आहे. कोहलीच्या नावावर ३१ कोटींच्या कार असून एका जाहिरातीसाठी तो साधारणपणे ४-५ कोटी आकारत असल्याचे समजते.

आजपासून भारत आणि EFTA व्यापार करार अंमलात; पुढील १५ वर्षांत १०० अब्ज डॉलरची गुंतवणूक होणार

नवी मुंबई विमानतळाला अखेर ‘एअरोड्रोम परवाना’; ८ ऑक्टोबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्‌घाटन

रिलायन्स इन्फ्रावर ‘ईडी’चे छापे; फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप

गोकुळकडून दूध उत्पादकांना दिवाळी भेट; १३६ कोटींचा ‘दरफरक’ जमा होणार

NPS आता अधिक आकर्षक; आजपासून १०० टक्के समभागात गुंतवणुकीची परवानगी