क्रीडा

इंग्लंडच्या दौऱ्यावर कोविडचे संकट राहिले उभे

कोविड-१९ मुळे अनुभवी फिरकी गोलंदाज अश्विन अजूनही भारतातच आहे.

वृत्तसंस्था

गेल्या वर्षी कोरोनामुळे अर्धवट सोडलेली कसोटी मालिका पूर्ण करण्यासाठी भारतीय संघ इंग्लंडला रवाना झालेला असताच रविचंद्रन अश्विनला कोरानाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यावर कोविडचे संकट उभे राहिले आहे. कोविड-१९ मुळे अनुभवी फिरकी गोलंदाज अश्विन अजूनही भारतातच आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय)एका सूत्राने पीटीआयला याबाबत माहिती दिली की, सध्या अश्विन क्वारंटाईनमध्ये आहे. त्याचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरच तो इंग्लंडला जाऊ शकेल.

भारत आणि इंग्लंड यांच्यात १ जुलै ते ५ जुलै या कालावधीत एक कसोटी सामना खेळविला जाणार आहे. त्यापूर्वी २४ जूनपासून भारतीय संघ लिसेस्टरशायर येथे चार दिवसीय सराव सामना खेळणार आहे. मात्र, त्यापूर्वीच भारतीय संघासाठी वाईट बातमी आली आहे. रविचंद्रन अश्विनला कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे.

सूत्राने स्पष्ट केले की, कोरोनाची लागण झाल्यामुळे अश्विन लीसेस्टरशायरविरुद्धच्या सराव सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. इंग्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटीसाठी बहुतेक खेळाडू इंग्लंडमध्ये पोहोचले असून त्यांचा जोरदार सराव सुरू आहे. अश्विन व्यतिरिक्त उर्वरित संघ लंडनला पोहोचला आहे. विराट कोहलीने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर रोहित शर्माकडे नेतृत्वाची जबाबदारी आलेली आहे. परदेशी भूमीवर प्रथमच कर्णधारपद भूषवणाऱ्या रोहित शर्माला के एल राहुलची उणीव भासणार आहे. या जोडीने भारताला या मालिकेत २-१ अशी आघाडी मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. यापूर्वी झालेल्या चार कसोटी सामन्यांमध्ये रोहितने एक शतक आणि दोन अर्धशतकांसह ३६८ धावा केल्या होत्या, तर राहुलने एक शतक आणि अर्धशतकासह ३१५ धावा केल्या होत्या. के एल राहुल दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडल्यानंतर शर्मा आणि गिल इंग्लंडविरुद्ध सलामी करताना दिसतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. भारतीय संघाला अश्विनच्या आगमनाची प्रतिक्षा असणार आहे.

Gurugram Hit-and-Run : महिला बाईक रायडरला कारची जोरदार धडक; फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद

Mumbai : मेट्रो ९ टप्पा २ साठी विशेष वाहतूक ब्लॉक; १५ ते २५ सप्टेंबर दरम्यान सकाळी वाहतूक उशीरा सुरू होणार

Jio-Airtel चा Vi ला दणका; मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीवरून TRAI कडून चौकशी सुरू, नेमकं प्रकरण काय?

Mumbai : दादर पूर्व स्टेशन परिसर होणार कोंडीमुक्त; टॅक्सी, बेस्टसाठी स्वतंत्र मार्गीका, टॅक्सी स्टँड

परिचारिकांना महिन्याला आठ सुट्या द्या; राज्य शासनाच्या धर्तीवर ४० तासांचा आठवडा करा, परिचारिका संघटनेने BMC चे लक्ष वेधले