क्रीडा

द्रविड यांच्या अनुपस्थितीत लक्ष्मण यांच्यावर प्रशिक्षकपदाची धुरा; बीसीसीआयचा निर्णय

द्रविड हे कोरोनाग्रस्त झाल्याने भारतीय संघाबरोबर यूएईला जाऊ शकले नाहीत.

वृत्तसंस्था

भारतीय क्रिकेट संघाचे मु‌ख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना कोरोना झाल्याने आता आशिया चषक स्पर्धेसाठी दुबईत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाशी व्हीव्हीएस लक्ष्मण हे जोडले गेल्याचे वृत्त आहे. यामुळे टीम इंडियासह रोहित शर्मालाही मोठा दिलासा मिळाला आहे.

द्रविड हे कोरोनाग्रस्त झाल्याने भारतीय संघाबरोबर यूएईला जाऊ शकले नाहीत. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्यावर प्रशिक्षकपदाची धुरा सोपविण्याचा निर्णय घेतला. सध्या झिम्बाब्वेमध्ये नुकत्याच संपलेल्या भारताच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत प्रशिक्षक म्हणून लक्ष्मण यांनी काम पाहिले होते. ते हरारेहून दुबईला पाहोचल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, झिम्बाब्वे मालिकेत खेळलेले आणि आशिया कप संघाचा भाग नसलेले खेळाडू भारतात परतले आहेत.

CJP च्या आंदोलनात सोनम वांगचुक यांचे बेमुदत उपोषण; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

भारताच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनची अंतिम चाचणी यशस्वी; जाणून घ्या फायदे आणि वैशिष्ट्ये

Pune : राजगडाजवळ मुंबईतील पर्यटकांची खासगी ट्रॅव्हलर बस दरीत कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जखमी

मध्यपूर्वेतील तणाव वाढला; अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांनंतर इराणचा बहरीन-कुवेतवर प्रतिहल्ला

Mumbai : '१५ हजार लोकांना ठार मारायचं होतं'; मोहरम मिरवणुकीतील विषारी कॅप्सूल प्रकरणात आरोपीची धक्कादायक कबुली