भारताच्या नकाशातून ईशान्य भाग वगळला, लव्हलिनाने साधला निशाणा X | IANS
क्रीडा

भारताच्या नकाशातून ईशान्य भाग वगळला, लव्हलिनाने साधला निशाणा

ग्लासगो येथील एका प्रसिद्ध भारतीय रेस्टॉरंटच्या नकाशात भारताचा ईशान्य भाग दाखवण्यात न आल्याने तारांकित लव्हलिना बोर्गोहैन हिने तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या प्रकारानंतर रेस्टॉरंटच्या मालकांनी आपली चूक मान्य करत ती दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले आहे.

Swapnil S

ग्लासगो : ग्लासगो येथील एका प्रसिद्ध भारतीय रेस्टॉरंटच्या नकाशात भारताचा ईशान्य भाग दाखवण्यात न आल्याने तारांकित लव्हलिना बोर्गोहैन हिने तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या प्रकारानंतर रेस्टॉरंटच्या मालकांनी आपली चूक मान्य करत ती दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले आहे.

यंदाच्या राष्ट्रकुलमध्ये भारतीय बॉक्सिंग संघाने ७ सुवर्ण आणि ३ रौप्य अशी एकूण १० पदके जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. भारताने राष्ट्रकुल स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच बॉक्सिंगमध्ये असे घवघवीत यश संपादन केले. या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी भारतीय बॉक्सिंग पथक ‘मिस्टर सिंग्स इंडिया, द होम ऑफ करी’ या प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये भोजनासाठी गेले होते. या स्पर्धेत रौप्यपदक विजेत्या लव्हलिनाच्या हे लक्षात आले की, रेस्टॉरंटच्या नॅपकिनवर आणि बाहेर प्रदर्शित केलेल्या भारताच्या नकाशातून ईशान्य भारताकडील भाग वगळण्यात आले आहेत. लव्हलिनाने तत्काळ ही बाब रेस्टॉरंट व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणून दिली.

“कृपया याचा गैरअर्थ काढू नका, पण यामुळे मला खूप वाईट वाटले आहे. भारताच्या नकाशात आमचा ईशान्य भारत गायब आहे. ईशान्य भारतातील रहिवासी म्हणून यामुळे आपल्या भावना दुखावल्या जातात. पुढील वेळी ही गोष्ट लक्षात ठेवावी,” असे लव्हलिनाने एका ऑनलाइन संवादादरम्यान स्पष्ट केले. यावेळी भारतीय बॉक्सिंग महासंघाचे अध्यक्ष अजय सिंग देखील उपस्थित होते. ते म्हणाले की, “या घटनेवरून कोणताही वाद किंवा वादविवाद झाला नाही. ही एक प्रशासकीय चूक होती आणि मी व लव्हलिनाने ती त्यांच्या निदर्शनास आणून दिली.” तसेच रेस्टॉरंटच्या मालकांनी ही चूक सुधारण्याचे आश्वासन दिले असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र एकूणच या प्रकरणाची सध्या समाज माध्यमांवर जोरदार चर्चा सुरू आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मुंबई ते वाढवण प्रवास वेगवान! उत्तन-विरार सी लिंक आता दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस महामार्गाला जोडण्यास मंजुरी

CSMT वर स्मार्ट डिजिटल डिस्प्ले प्रणाली; गाडीची अद्ययावत माहिती एका नजरेत उपलब्ध

युरियाचा ८८ लाखांचा काळाबाजार उघडकीस; खताच्या ७२८ गोण्या जप्त, लासलगाव पोलिसांची मोठी कामगिरी

Bhiwandi : 'आधी पुनर्वसन, मगच कारवाई'ची भूमिका; कोहिनूर दुर्घटनेनंतर पाडकामाला रहिवाशांचा विरोध, नागरिकांशी आज सविस्तर चर्चा

राज्य धर्मस्वातंत्र्य विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी; राज्यात कायदा लागू, बेकायदेशीर धर्मांतर करणाऱ्यांना १० वर्षांपर्यंतचा कारावास