बोगस क्रीडा प्रमाणपत्राला चाप! खेळाडूंसाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर 'क्रीडा ई-प्रमाण' प्रणाली, आता घरबसल्या मिळणार क्रीडा ई-प्रमाणपत्र 
क्रीडा

बोगस क्रीडा प्रमाणपत्राला चाप! खेळाडूंसाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर 'क्रीडा ई-प्रमाण' प्रणाली, आता घरबसल्या मिळणार क्रीडा ई-प्रमाणपत्र

राज्यातील गुणवंत खेळाडूंना शासकीय आणि निमशासकीय सेवांमध्ये ५ टक्के आरक्षणाचा लाभ अधिक सुलभ, पारदर्शक आणि जलद गतीने मिळण्याकरिता क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने 'क्रीडा ई-प्रमाण' ही ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित अद्ययावत प्रणाली कार्यान्वित केली आहे.

Swapnil S

पुणे : राज्यातील गुणवंत खेळाडूंना शासकीय आणि निमशासकीय सेवांमध्ये ५ टक्के आरक्षणाचा लाभ अधिक सुलभ, पारदर्शक आणि जलद गतीने मिळण्याकरिता क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने 'क्रीडा ई-प्रमाण' ही ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित अद्ययावत प्रणाली कार्यान्वित केली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग तसेच इतर सर्व शासकीय पदभरतीसाठी अर्ज करताना खेळाडूंना आता 'क्रीडा ई-प्रमाणपत्रा'ची प्रत जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे. या प्रमाणपत्राशिवाय खेळाडू संवर्गातून अर्जाचा विचार केला जाणार नाही, तसेच ज्या खेळांचे अभिलेख प्रणालीवर उपलब्ध आहे, त्यांनी तत्काळ या प्रणालीचा लाभ घेऊन आपले डिजिटल पडताळणी प्रमाणपत्र घरबसल्या प्राप्त होणार आहे.

ज्या खेळाडूंनी यापूर्वी विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा यांच्याकडून प्रमाणपत्रांची पडताळणी केलेली आहे, त्यांनी यापुढे शासकीय व निमशासकीय भरतीसाठी अर्ज सादर करावयाचा असल्यास, या प्रणालीद्वारे प्रमाणपत्र तयार करून घेणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी आणि मार्गदर्शक सूचनांसाठी खेळाडूंनी https://sports.maharasht ra.gov.in या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहल क्रीडा उपसंचालक सुधीर मोरे यांनी केले आहे.

प्रमाणपत्रात फेरफार करता येणार नाही

ब्लॉकचेन तंत्रज्ञान ही प्रणाली ब्लॉकचेन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असल्याने यामध्ये कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप किंवा फेरफार करता येत नाही. ज्यामुळे बोगस प्रमाणपत्रांना पूर्णपणे आळा बसणार आहे. क्रीडा आयुक्त शीतल तेली-उगले यांनी सांगितले की, "खेळाडूने माहिती भरल्यानंतर आणि मूळ माहितीशी ती जुळल्यास, अवघ्या २४ तासांच्या आत डिजिटल पडताळणी अहवाल उपलब्ध होणार आहे. प्रत्येक प्रमाणपत्रावर एक अद्वितीय क्यूआर कोड असल्यामुळे संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्यांना प्रमाणपत्राची सत्यता त्वरित पडताळणी करता येणार आहे."

शेकोटीसाठी कचरा जाळल्यास पाच हजारांचा दंड! प्रदूषण रोखण्यासाठी ठाणे महापालिकेचा दणका

झोपेचं सोंग घेऊन महिलेशी अश्लील चाळे; जाग येताच महिलेने लगावली थप्पड, रुग्णालयातील VIDEO व्हायरल

सोशल मीडियावर GTA 6 फोटो ट्रेंडची धूम! तुमचाही फोटो दिसेल व्हाइस सिटी पोस्टरसारखा; जाणून घ्या सोपी ट्रिक

UP Viral Video : घटस्फोट न घेताच दुसऱ्या लग्नाचा घाट; बोहल्यावर चढण्याआधीच नवरदेव पोलिसांच्या ताब्यात, पहिल्या पत्नीने उधळला डाव

Dombivli Crime : ७ वर्षांचं प्रेम संपलं अन् तरुणाचा संताप अनावर; पेट्रोल टाकून माजी प्रेयसीचं घर पेटवण्याचा प्रयत्न