Photo : X (@TennisHalloFame)
क्रीडा

मारिया शारापोव्हा आणि ब्रायन ब्रदर्स यांचा सन्मान; 'टेनिस हॉल ऑफ फेम 'मध्ये स्थान

रशियन टेनिसपटू मारिया शारापोव्हा आणि ब्रायन ब्रदर्स यांचा टेनिस हॉल ऑफ फेममध्ये स्थान देण्यात आले आहे. २००६ मध्ये यूएस ओपन, २००८ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन, २०१२ आणि २०१४ मध्ये फ्रेंच ओपन अशी एकूण ५ ग्रैंड स्ल म जिंकण्याची मारिया कामगिरी शारापोव्हाने केली.

Swapnil S

लंडन : रशियन टेनिसपटू मारिया शारापोव्हा आणि ब्रायन ब्रदर्स यांचा टेनिस हॉल ऑफ फेममध्ये स्थान देण्यात आले आहे. २००६ मध्ये यूएस ओपन, २००८ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन, २०१२ आणि २०१४ मध्ये फ्रेंच ओपन अशी एकूण ५ ग्रैंड स्ल म जिंकण्याची मारिया कामगिरी शारापोव्हाने केली. डब्ल्यूटीएच्या एकेरीत प्रथम क्रमांकावर पोहोचणारी ती पहिली रशियन खेळाडू ठरली. २०२० मध्ये, वयाच्या ३२ व्या वर्षी तिने टेनिसमधून निवृत्ती घेतली. तिने तब्बल १५ वर्षे आंतरराष्ट्रीय टेनिस कोट गाजवला.

दुसरीकडे, बॉब आणि माइक ब्रायन या जुळ्या बंधूंनी पुरुष दुहेरीत विक्रमी १६ ग्रँडस्लॅम जिंकण्याची कामगिरी केली आहे. तसेच डबल्समध्ये सर्वाधिक वेळ प्रथम क्रमांकावर राहण्याची कामगिरी या जुळ्या बंधुंच्या नावावर आहे.

तपासात फेरफाराची भीती; पुढील निर्णय घेण्यापूर्वी महिनाभर तपासावर लक्ष ठेवणार- जरांगे

भारताचा हेतू योग्य नाही, पाकिस्तानमुळे काश्मिरी सुरक्षित; डॉ. फारुख अब्दुल्ला यांचे धक्कादायक वक्तव्य

देशातील मतदार याद्यांचीच चौकशी करा! उत्तर प्रदेशातील मतदार यादीत त्रुटी आढळल्यानंतर काँग्रेसची भूमिका

एशियाटिकमधील वंदे मातरम् अपमान प्रकरण : डॉ. मुणगेकरांवर कारवाईची टांगती तलवार

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण : आणखी एका आरोपीला इंदूरमधून अटक