क्रीडा

मिचेल स्टार्क ठरला IPLच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू, लागली तब्बल २४.७५ कोटींची बोली

आयपीएलच्या यंदाच्या सत्रात आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड तोडले गेले आहेत. IPLमध्ये आतापर्यंत २० कोटींवर कोणत्याही खेळाडूवर बोली लागली नव्हती. मात्र, यंदा २० कोटींचा टप्पा ते देखील दोनदा ओलांडला गेला.

Swapnil S

क्रिकेटप्रेमी ज्या दिवसाची आतूरतेने वाट पहात होते तो दिवस अखेर उजाडला आहे. आज (१९ डिसेंबर) दुबईत आयपीएल २०२४ च्या सत्राचा लिलाव होत आहे. यावेळी ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज मिचेल स्टार्क हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.

सुरुवातीला त्याच्यावर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली संघाने २ कोटी रुपयांच्या मुळ किंमतीसह बोली लावली. पण, नंतर गुजरात आणि कोलकाता संघाने स्टार्कसाठी कंबर कसली आणि बोलीत उडी घेतली. २ कोटींवरून सुरू झालेली ही बोली अखेर तब्बल २४.७५ कोटींपर्यंत पोहोचली आणि कोलकात्याने स्टार्कला आपल्या चमूत सामील केले.

आयपीएलच्या यंदाच्या सत्रात आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड तोडले गेले आहेत. IPLमध्ये आतापर्यंत २० कोटींवर कोणत्याही खेळाडूवर बोली लागली नव्हती. मात्र, यंदा २० कोटींचा टप्पा ते देखील दोनदा ओलांडला गेला.

स्टार्कच्या आधी सनरायझर्स हैदराबादने ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सला २०.५० कोटी रुपयांना विकत घेत हा रेकॉर्ड मोडला. पण, थोड्याच वेळात कोलकाता नाईट रायडर्सने मिचेल स्टार्कला २४.७५ कोटी रुपयांना खरेदी करत पॅट कमिन्सला मागे टाकले. यासोबतच स्टार्क IPL लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला.

देशभरातील सार्वजनिक ठिकाणांहून भटक्या कुत्र्यांना हटवा; सुप्रीम कोर्टाचा मोठा आदेश

लाडकी बहीण योजनेत १८ नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण करणे अनिवार्य

Thane : पालिका निवडणुकीची सूत्रे आमदार संजय केळकरांकडे; ठाण्यात शिंदे सेना आणि भाजपमध्ये तणाव वाढणार

बांगलादेशात कांद्याचे भाव शंभरी पार; भारतीय निर्यातदारांकडून आयातबंदी उठवण्याची मागणी

वैद्यकीय अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांची पाठ! तिसऱ्या फेरीनंतरही वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या ३८७ जागा रिक्त