क्रीडा

Candidates Chess 2024: ग्रँडमास्टर डी. गुकेशची ऐतिहासिक कामगिरी; १७ व्या वर्षी रचला इतिहास

गुकेशने कँडिडेट्स स्पर्धा जिंकल्यानंतर चीनचा ग्रँडमास्टर डिंग लिरेन याला आता आव्हान देणार आहे. या वर्षा अखेरीस गुकेश आणि डिंग लिरेन यांच्या सामना होणार आहे.

Swapnil S

मुंबई : ग्रँडमास्टर डी. गुकेशने कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. गुकेशने वयाच्या १७ व्या वर्षी कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारा पहिला तरुण खेळाडू बनला आहे. गुकेशने १४ व्या आणि शेवटच्या फेरीत अमेरिकेच्या हिकारू नाकामुरा यांच्यासोबत सामना झाला. यात गुकेशचा सामना बराबरीचा झाला होता. परंतु टुर्नामेंटमध्ये गुकेशला ९ गुण मिळाल्यामुळे त्याने खिताब आपल्या नावावर केला. या स्पर्धेतील नाकामुरा, कारुआना फॅबिओ इयान नेपोनिआच यांना ८.५ गुण मिळाले.

गुकेशने कँडिडेट्स स्पर्धा जिंकल्यानंतर चीनचा ग्रँडमास्टर डिंग लिरेन याला आता आव्हान देणार आहे. या वर्षा अखेरीस गुकेश आणि डिंग लिरेन यांच्या सामना होणार आहे. कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारा गुकेश हा दुसरा भारतीय आहे. यापूर्वी ग्रेट चेस खेळाडू विश्वनाथ आनंद यांनी हा खिताब आपल्या नावावर केला आहे.

गुकेशच्या विजयानंतर विश्वनाथ आनंद यांनी ट्वीट करत त्यांचे अभिनंदन केले आहे. विश्वाथ आनंदने ट्वीटमध्ये म्हणाले, तू युवा चॅलेंजर झाल्याबद्दल गुकेश तुझे खूप अभिनंदन. आम्हा सर्वांना तुझा अभिमान आहे. तू ज्या प्रकारे कठीण प्रसंग हाताळला. त्याबद्दल माल वैयक्तिक तुझा अभिमान वाटत आहे."

गुकेशने मोडला गॅरी कास्पोरोव्हचा रिकोर्ड

तब्बल तीन दशकांपासून कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारा खिताब हा रशियन चेट खेळाडू गॅरी कास्पारोव्ह यांच्या नावावर होता. १९८४ च्या कँडिडेट्स चेट टूर्नामेंट गँरी कास्पोरोव्ह यांनी वयाच्या २२ वर्षी टूर्नामेंट जिंकून रिकोर्ड आपल्या नावी केला होता. आता १७ वर्षीय डी. गुकेशने हा रिकोर्ड मोडला.

Mumbai : लोकल प्रवाशांसाठी सूचना; उद्या 'या' रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक, वाचा वेळापत्रक

LPG सिलिंडर बुकिंग आता आणखी सोपं! व्हॉट्सॲप, मिस्ड कॉलपासून ॲपपर्यंत अनेक सुविधा उपलब्ध

विमान तिकिटे महागणार! Air India-IndiGo नंतर Akasa Air कडूनही इंधन अधिभार; वाचा सविस्तर

देशात पेट्रोल-डिझेलचा तुटवडा नाही; घाबरून इंधन साठवू नका, केंद्र सरकारचे नागरिकांना आवाहन

पुण्यात धक्कादायक घटना; लिफ्टच्या दरवाज्यात अडकला चिमुकलीचा हात, CCTV व्हिडिओ व्हायरल