क्रीडा

न्यूझीलंड-आफ्रिका कसोटी मालिका: विल्यम्सनचे दुसऱ्या डावातही शतक

विल्यम्सनने कसोटी कारकीर्दीतील ३१वे शतक साकारले. तसेच न्यूझीलंडसाठी कसोटीच्या दोन्ही डावांत शतक झळकावणारा तो पाचवा फलंदाज ठरला.

Swapnil S

वेलिंग्टन : तारांकित फलंदाज केन विल्यम्सनने (१३२ चेंडूंत १०९ धावा) दुसऱ्या डावातही साकारलेल्या शतकाच्या बळावर न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीवर भक्कम पकड मिळवली आहे. तिसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडने दुसऱ्या डावात ४ बाद १७९ धावा केल्या असून ते तब्बल ५२८ धावांनी आघाडीवर आहेत.

सोमवारच्या ४ बाद ८० धावांवरून पुढे खेळताना आफ्रिकेचा पहिला डाव ७२.५ षटकांत १६२ धावांत आटोपला. मॅट हेन्री व मिचेल सँटनर यांनी प्रत्येकी तीन बळी पटकावले. त्यामुळे किवींना तब्बल ३४९ धावांची आघाडी मिळाली. मात्र त्यांनी फॉलोऑन न लादता पुन्हा फलंदाजी केली. पहिल्या डावात ११८ धावा करणाऱ्या विल्यम्सनने यावेळी १२ चौकार व १ षटकारांसह शतक झळकावले. दिवसअखेर डॅरेल मिचेल ११, तर टॉम ब्लंडेल ५ धावांवर खेळत आहे.

विल्यम्सनने कसोटी कारकीर्दीतील ३१वे शतक साकारले. तसेच न्यूझीलंडसाठी कसोटीच्या दोन्ही डावांत शतक झळकावणारा तो पाचवा फलंदाज ठरला. यापूर्वी ग्लेन टर्नर, जेफ होवार्थ, अँड्रयू जोन्स व पीटर फुल्टन यांनी अशी कामगिरी केली होती.

सोने दरात उसळी; चांदीही महागली; मौल्यवान धातू महिन्याच्या उच्चांकावर

नागपूर अत्याचार प्रकरणातील आरोपीचे कोठडीतही चोचले; नाश्त्याला पिझ्झा, झोपायला मऊ बिछान्याची मागणी

Mumbai : विक्रोळीत सख्ख्या भावांमध्ये रक्तरंजित राडा; मोठ्या आवाजात गाणी लावल्याच्या वादातून डबल मर्डर

रेल्वे परिसरात धूम्रपान केल्यास २ हजारांचा दंड; फेरीवाले, अनधिकृत प्रवेशावरही कडक कारवाई

ठाणे जिल्ह्यात 'कॅन्सर व्हॅन'द्वारे मोफत तपासणी; ऑगस्टभर जनजागृती मोहीम; तीन टप्प्यात मार्गदर्शन