क्रीडा

न्यूझीलंडचा पाकिस्तानवर नऊ विकेट‌्स राखून विजय; मायकेल ब्रेसवेल सामनावीर

अवघ्या ११ धावांच्या मोबदल्यात दोन विकेट‌्स घेणाऱ्या मायकेल ब्रेसवेलला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

वृत्तसंस्था

टी-२० तिरंगी मालिकेत न्यूझीलंडने पाकिस्तानवर नऊ विकेट‌्स राखून विजय मिळविला. या सामन्यात न्यूझीलंडच्या प्रभावी गोलंदाजीपुढे पाकिस्तानचे फलंदाज निष्प्रभ ठरले. टी-२० तिरंगी मालिकेत पाकिस्तानविरुद्ध किवींचा हा पहिला विजय आहे. चार षटकांत अवघ्या ११ धावांच्या मोबदल्यात दोन विकेट‌्स घेणाऱ्या मायकेल ब्रेसवेलला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

विजयासाठीचे १३१ धावांचे माफक लक्ष्य फिन ॲलन (४२ चेंडूंत ६२ धावा) आणि डेव्हॉन कॉनवे (४६ चेंडूंत नाबाद ४९) यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर नऊ विकेट‌्स आणि २३ चेंडू राखून साध्य केले.

त्याआधी, फिरकीपटूंच्या प्रभावी गोलंदाजीमुळे यजमानांनी पाकिस्तानला ७ बाद १३० धावांवर रोखले. पाकिस्तानकडून इफ्तिखार अहमदने २७ चेंडूंत सर्वाधिक २७ धावा केल्या. कर्णधार बाबर आझम (२३ चेंडूंत २१), स्टार सलामीवीर मोहम्मद रिझवान (१७ चेंडूंत १६), शादाब खान (७ चेंडूंत ८), शान मसूद (१२ चेंडूंत १४), हैदर अली (११ चेंडूंत ८)आणि मोहम्मद नवाझ (१ चेंडूंत ०) हे स्टार फलंदाज पूर्णत: अपयशी ठरले.

न्यूझीलंडकडून ब्रेसवेलने शानदार गोलंदाजी केली. मायकेल ब्रेसवेलने चार षटकांत केवळ ११ धावा देत दोन बळी घेतले. मिचेल सँटनर, टिम साउथी आणि यांनीही प्रत्येकी दोन विकेट‌्स मिळविले. ईश सोधीने एक फलंदाज बाद केला.

गणपती गेले गावाला...! 'पुढच्या वर्षी लवकर या'चा घुमला जयघोष; दहा दिवसांच्या गणेश मूर्तीचे उत्साहात विसर्जन

Maharashtra : बाप्पाच्या निरोपावेळी दुर्दैवी घटना; राज्यात ७ जणांचा मृत्यू

मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा गजाआड; गोंधळ माजवण्यासाठी पाठवला संदेश

भारतासोबतचे संबंध पुन्हा स्थापित करण्यास तयार! ट्रम्प यांना आली उपरती; मोदींकडून ट्रम्प यांच्या विचारांचे कौतुक

२६ देश युक्रेनला सुरक्षा हमी देणार