Photo - X/@DjokerNole 
क्रीडा

नोव्हाक जोकोविचची चौथ्या फेरीत धडक; यूएस ओपनमध्ये दुखापतीवर मात करत मिळवला विजय

पाठीच्या दुखापतीने त्रस्त असलेल्या नोव्हाक जोकोविचने शुक्रवारी रात्री कॅम नॉरीला धूळ चारत यूएस ओपनच्या चौथ्या फेरीत प्रवेश केला.

Swapnil S

न्यूयॉर्क: पाठीच्या दुखापतीने त्रस्त असलेल्या नोव्हाक जोकोविचने शुक्रवारी रात्री कॅम नॉरीला धूळ चारत यूएस ओपनच्या चौथ्या फेरीत प्रवेश केला. अशी कामगिरी करणारा ३८ वर्षीय जोकोविच हा सर्वात वयस्कर पुरुष खेळाडू ठरला आहे.

जोकोविचने ६-४, ६-७ (४), ६-२, ६-३ असा विजय मिळवला. २४ वेळाचा ग्रँड स्लॅम विजेत्या जोकोविचला सामन्यादरम्यान वैद्यकीय मदतीची गरज भासली. मात्र त्यावर मात करत जोकोविचने विजय मिळवला. पुढच्या लढतीत जोकोविचसमोर जर्मनीच्या जानलेनरर्डचे आव्हान आहे.

सामन्यानंतर जोकोविचने त्याच्या दुखापतीबद्दल बोलण्यास नकार दिला. मी ठिक आहे. मी तरुण असून तितकाच ताकदवान असल्याचे तो म्हणाला.

पहिल्या सेटमध्ये त्याला पाठीचा त्रास जाणवू लागला. त्यानंतर त्याने चेअर अम्पायरला फिजिओची मदत हवी असल्याचे सांगितले आणि लगेचच त्याने मेडिकल टाइमआऊट घेतला. काही वेळात तो कोर्टवर परतला आणि पहिला सेट जिंकला.

दरम्यान अन्य लढतीत गुडघ्याच्या त्रासावर मात करत कार्लोस अल्काराझने विजय मिळवला. यूएस ओपनच्या तिसऱ्या फेरीत आर्थर अशे स्टेडियममध्ये शुक्रवारी त्याने आघाडी घेतली होती. त्यावेळी फोरहँड मारताना त्याच्या उजव्या गुडघ्याला त्रास झाला. अल्काराझने २०२२ मध्ये त्याचा पहिला ग्रँड स्लॅम जिंकला.

महायुतीच ठरलं! स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मुंबईत युती तर अन्यत्र स्वबळावर लढण्याचे संकेत

आजचे राशिभविष्य, २३ ऑक्टोबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

लक्ष्मीपूजनाला वरुणराजाचे 'फटाके'! दिवाळीच्या धामधुमीत मुंबई, ठाणे, नवी मुंबईत अवकाळी पावसाचे धुमशान

दिवाळीच्या सणात पावसाची आतषबाजी; शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान

दिवाळीनिमित्त मोदींचे देशवासीयांना पत्र; स्वदेशी, भाषा, आरोग्य यासह ऑपरेशन सिंदूरचाही केला उल्लेख