पीटीआय
क्रीडा

पावसाची कृपा, तरी पदरी पराभवच! न्यूझीलंडचा तब्बल ३६ वर्षांनी भारतात कसोटी विजय

न्यूझीलंडने तब्बल ३६ वर्षांनी भारतात कसोटी सामना जिंकण्याची किमया साधताना पहिल्या लढतीत यजमानांना ८ गडी राखून धूळ चारली. या विजयासह न्यूझीलंडने ३ लढतींच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

Swapnil S

बंगळुरू: तारांकित वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने (२९धावांत २ बळी) प्रारंभी दिलेले धक्के आणि पावसाच्या कृपेनंतरही रविवारी भारतीय संघाच्या पदरी पराभवच पडला. न्यूझीलंडने तब्बल ३६ वर्षांनी भारतात कसोटी सामना जिंकण्याची किमया साधताना पहिल्या लढतीत यजमानांना ८ गडी राखून धूळ चारली. या विजयासह न्यूझीलंडने ३ लढतींच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. प्रतिभावान डावखुरा फलंदाज रचिन रवींद्र (१३४ आणि नाबाद ३९ धावा) किवी संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

पाचव्या भारत-न्यूझीलंड पहिल्या कसोटी सत्रातच २७.४ मालिका पावसामुळे सामना

बंगळूरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या उभय संघांतील या लढतीत भारताने दिलेले १०७ धावांचे लक्ष्य न्यूझीलंडने दिवशी षटकांत दोन फलंदाजांच्या मोबदल्यात गाठले. पहिला दिवस पावसामुळे वाया गेल्यावर दुसऱ्या दिवशी भारताचा अवघ्या ४६ धावांतच खुर्दा झाला. भारताची ही मायदेशातील निचांकी धावसंख्या ठरली. मग न्यूझीलंडने ४०२ धावा करताना ३५६ धावांची आघाडी मिळवली. तरीही दुसऱ्या डावातील मेहनतीमुळे भारताने किवी संघाला पाचव्या दिवसापर्यंत विजयासाठी झुंजवले. मुंबईकर सर्फराज खानचे दीडशतक व ऋषभ पंत, विराट कोहली, कर्णधार रोहित शर्मा यांच्या अर्धशतकांमुळे भारताने ४६२ धावा केल्या व किवीपुढे १०७ धावांचे लक्ष्य उभे ठाकले. चौथ्या दिवशी न्यूझीलंडच्या डावातील फक्त ४ चेंडू झाल्यावर अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला होता.

रविवारी सकाळी जवळपास तासभर उशिरा सुरू झाल्याने एकवेळ लढत अनिर्णित राहणार, असे वाटत होते. मग १०.१५च्या सुमारास खेळ सुरू झाल्यावर भारताच्या वेगवान जोडीने टिच्चून मारा करताना पहिल्या ८ षटकांत फक्त ९ ते १० धावा दिल्या. तसेच बुमराने सलामीवीरांना माघारी पाठवल्यावर चुरस निर्माण झाली. कर्णधार टॉम लॅथम शून्यावरच पायचीत झाला, तर डेवॉन कॉन्वे १७ धावांवर बाद झाला. मात्र २ बाद ३५ स्थितीतून रचिन रविंद्र (४६ चेंडूंत नाबाद ३९) आणि विल यंग (७६ चेंडूंत नाबाद ४८) यांनी समर्थपणे भारतीय गोलंदाजांचा सामना केला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ७५ धावांची अभेद्य भागीदारी रचून न्यूझीलंडचा विजय साकारला. पहिल्या डावात १३४ आणि दुसऱ्या डावात नाबाद ३९ धावा करणाऱ्या रचिनला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

१९६९ आणि १९८८ नंतर न्यूझीलंडने प्रथमच भारतात कसोटी सामना जिंकला. ३६ वर्षांपूर्वी त्यांनी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारताला धूळ चारली होती, आता २४ ऑक्टोबरपासून पुणे येथे उभय संघांतील दुसरी कसोटी सुरू होईल. त्यानंतर वानखेडे येथे १ नोव्हेंबरपासून तिसरी कसोटी खेळवण्यात येईल. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची (वल्र्ड टेस्ट चॅम्पियनशीप) अंतिम फेरी गाठण्याच्या दृष्टीने ही मालिका महत्त्वाची असल्याने रोहितचे शिलेदार कशाप्रकारे पुनरागमन करणार, हे पाहणे रंजक ठरेल.

  • - न्यूझीलंडचा संघ भारतात ३७ कसोटी सामने खेळला असून त्यांपैकी त्यांचा हा फक्त तिसरा (१९६९, १९८८, २०२४) विजय ठरला. १९६९ मध्ये ग्रॅहम डोलिंग, १९८८ मध्ये जॉन राईट न्यूझीलंडचे कर्णधार होते.

  • - १९ वर्षानी भारताला चिन्नास्वामी स्टेडियमवर कसोटी सामना गमवावा लागला. २००५मध्ये पाकिस्तानने या स्टेडियममध्ये भारताला नमवले होते. त्यानंतर भारताने येथील ८ पैकी ५ कसोटी जिंकल्या, तर ३ अनिर्णित राखल्या होत्या.

  • - तब्बल २४ वर्षानी प्रथमच भारतात विदेशी संघाने चौथ्या डावात १०० हून अधिक धावांचा यशस्वी पाठला केला. यापूर्वी २००० मध्ये मुंबईत दक्षिण आफ्रिकेने चौथ्या डावात १६३ धावांचे लक्ष्य गाठले होते.

  • - एकाच कॅलेंडर वर्षात मायदेशात २ कसोटी सामने गमावण्याची (जानेवारी वि. इंग्लंड, ऑक्टोबर वि. न्यूझीलंड) नामुष्की भारतावर १२ वर्षानी ओढवली. यापूर्वी २०१२मध्ये इंग्लंडने भारताला २ कसोटीमध्ये नमवले होते. ही मालिका भारताने गमावलेली.

भारतीय संघात सुंदरचा समावेश

न्यूझीलंडविरुद्ध पुणे आणि मुंबई येथे होणाऱ्या उर्वरित २ कसोटी सामन्यांसाठी ऑफस्पिनर अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरचा भारताच्या संघात समावेश करण्यात आला आहे. २५ वर्षीय सुंदरने रणजी स्पर्धेत तमिळनाडूकडून खेळताना दिल्लीविरुद्ध १५२ धावांची दमदार खेळी साकारली. २०२१च्या बॉर्डर- गावस्कर मालिकेत भारताला विजय मिळवून देण्यात सुंदरने मोलाची भूमिका बजावली होती. त्यामुळे नोव्हेंबरच्या अखेरीस ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यापूर्वी सुंदरला संघाच्या वातावरणात राहण्याची संधी मिळावी, या हेतूने त्याचा समावेश करण्यात आला असावा, असे समजते. दरम्यान, याव्यतिरिक्त पहिल्या कसोटीचाच चमू कायम राखण्यात आला असून शुभमन गिल संघात परतण्याची शक्यता आहे.

संक्षिप्त धावफलक

भारत (पहिला डाव): ३१.२ षटकांत सर्व बाद ४६

न्यूझीलंड (पहिला डाव) : ९१.३ षटकांत सर्व बाद ४०२

भारत (दुसरा डाव): ९९.३ षटकांत सर्व बाद ४६२

न्यूझीलंड (दुसरा डाव) : २७.४ षटकात २ बाद ११० (विल यंग नाबाद ४८, रचिन रवींद्र नाबाद ३९, जसप्रीत बुमरा २/२९)

निकाल न्यूझीलंड विजयी (मालिकेत १-० अशी आघाडी) सामनावीर - रचिन रवींद्र

ठरलं तर..! महायुती, मविआचे जागावाटप निश्चित; आज यादी जाहीर होण्याची शक्यता, बघा कुणाला किती जागा?

पक्षप्रवेशाची लाट! संदीप नाईकांनी फुंकली 'तुतारी', निलेश राणेंचा आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; बडोले अजितदादा गटात दाखल

चीनवर विश्वास ठेवायला वेळ लागेल; लडाख कराराबाबत लष्करप्रमुख द्विवेदी यांचा सावध पवित्रा

Maharashtra Assembly Elections 2024: जागावाटपापूर्वीच अजितदादांनी १७ जणांना दिले ‘एबी फॉर्म’

Maharashtra Assembly Elections 2024: नवाब मलिक यांच्या उमेदवारीला भाजपचा विरोध