क्रीडा

पी. व्ही. सिंधू व प्रणीत यांना पहिल्याच फेरीत पत्करावी लागली हार

पराभवामुळे पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या तयारीवर विपरित परिणाम होण्याची शक्यता

वृत्तसंस्था

इंडोनेशिया ओपन सुपर १००० बॅडमिंटन स्पर्धेत ऑलिम्पिकमध्ये दोन वेळा पदक जिंकणारी पी. व्ही. सिंधू मंगळवारी चीनच्या ही बिंग जियाओ हिच्याकडून सरळ गेममध्ये पराभूत झाली. बी. साई प्रणीतला पुरुष एकेरीत डेन्मार्कच्या हॅन्स क्रिस्टियन सोलबर्ग विटिंगसकडून १६-२१, १९-२१ अशी हार पत्करावी लागली.

सातव्या मानांकित सिंधूला महिला एकेरीत बिंग जियाओने १४-२१, १८-२१ असा पराभव पत्करावा लागला. या विजयाबरोबरच बिंग जियाओचा सिंधूविरुध्दचा रेकॉर्ड १०-८ असा झाला. सिंधूने बिंग जियाओविरुध्द संथ सुरूवात केली. चीनच्या खेळाडूने मग ९-२ अशी आघाडी घेतली. ब्रेकपर्यंत तिने ११-४ अशी आघाडी मिळविली.

या पराभवामुळे पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या तयारीवर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. माजी विश्व चॅम्पियन सिंधूने या हंगामात केवळ दोनच विजेतेपदे जिंकली आहेत.

दरम्यान, ईशान भटनागर आणि तनीषा क्रास्टो यांनाही मिश्र दुहेरीत पराभव पत्करावा लागला. या भारतीय जोडीला हॉगकॉगच्या चांग टाक चिंग आणि एनजी विंग युंग होंग जोडीने अवघ्या ३२ मिनिटांत १४-२१, ११-२१ असे पराभू्त करून स्पर्धेतून बाद केले.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत