संग्रहित छायाचित्र 
क्रीडा

पाकिस्तानचा लवकरच यू-टर्न! भारताविरुद्धच्या सामन्याचा निर्णय २४ तासांत: PCB अध्यक्ष मोहसिन नक्वी

टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताविरुद्ध खेळण्यास पाकिस्तानने नकार दिल्याने सध्या हा सामना होणार की नाही, याचीच चर्चा जास्त आहे.

Krantee V. Kale

लाहोर : टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याच्या आपल्या निर्णयावरून पाकिस्तान लवकरच पलटी मारण्याची शक्यता आहे. आयसीसीच्या प्रतिनिधिमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

पाकिस्तानचा संघ भारताविरुद्धच्या टी-२० विश्वचषक सामन्यावर बहिष्कार घालणार की नाही, यावर अंतिम निर्णय पुढील २४ तासांत स्पष्ट होईल, असे नक्वी यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना सांगितले. नक्वी म्हणाले की, “पीसीबीने उपस्थित केलेल्या काही मुद्द्यांवर आयसीसी आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून उत्तराची प्रतीक्षा आहे. भारताविरुद्धचा सामना १५ फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे होणार आहे. आम्ही आयसीसीशी चर्चा केली आहे. सध्या मी कोणतीही टिप्पणी करणे योग्य होणार नाही. त्यांचे उत्तर मिळाल्यावर आम्ही निर्णय घेऊ. आयसीसीचे उत्तर आल्यानंतर आम्ही सल्ल्यासाठी पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याकडे जाऊ. मंगळवारी किंवा बुधवारी या सामन्याविषयीची अंतिम घोषणा केली जाईल.” तथापि, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तान सरकारकडूनही आता पीसीबीला हिरवा कंदील मिळाला असून केवळ अधिकृत घोषणा बाकी आहे.

आम्ही कोणत्याही धमक्यांना घाबरणारे नाही

“सध्या आम्ही जास्त काही बोलू शकत नाही, कारण आयसीसी आणि बांगलादेश यांच्यात वाटाघाटी सुरू आहेत. बांगलादेशची भूमिका योग्य होती, त्यामुळे आम्हाला त्यांना पाठिंबा द्यावा लागला,” असेही नक्वी म्हणाले. सुरक्षेच्या कारणास्तव भारतात खेळण्यास नकार दिल्यामुळे बांगलादेशला स्पर्धेतून बाहेर काढण्यात आले आहे. आयसीसीच्या कारवाईच्या इशाऱ्यामुळे पीसीबीवर दबाव असल्याच्या सूचनाही नक्वी यांनी फेटाळून लावल्या. “आम्ही कोणत्याही धमक्यांना घाबरणारे नाही. आपले लष्कर प्रमुख असिम मुनीर कोण आहेत, हे सर्वांना माहीत आहे. आम्हाला कोणत्याही निर्बंधांची चिंता नाही,” असेही नक्वी म्हणाले. दरम्यान, भारताविरुद्ध खेळण्यासाठी पाकिस्तानने ठेवलेल्या काही मागण्या आयसीसीने धुडकावल्या आहेत. तर, बांगलादेशच्या बाबतीत केलेल्या काही मागण्या मान्य करण्यात आल्याचंही समजतंय.

Jharkhand Student Protest : भरती परीक्षांविरोधातील आंदोलन तीव्र; पोलिसांना धक्काबुक्की, ABVP चे ११० कार्यकर्ते ताब्यात

Mumbai-Pune Expressway : 'मिसिंग लिंक' उद्या ३ तास बंद; प्रवासाला निघण्यापूर्वी वाचा महत्त्वाची बातमी

IPL क्रिकेटपटू अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचाराचा आरोप

Government Holiday : मुंबईकरांना दहीहंडीऐवजी रक्षाबंधनला सुट्टी; ऑगस्टअखेरीस मिळणार सलग ३ दिवसांचा ब्रेक

Mumbai : 'लोकलमधील ३ डबे विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवा'; Gen Z, Gen Alpha साठी तेजस्वी घोसाळकरांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी