PTI
क्रीडा

Paralympic Games Paris 2024: प्रीतीची सलग दुसऱ्यांदा 'कांस्यदौड'

भारताच्या प्रीती पालने ॲथलेटिक्समधील महिलांच्या २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदक पटकावले.

Swapnil S

पॅरिस : भारताच्या प्रीती पालने ॲथलेटिक्समधील महिलांच्या २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदक पटकावले. २३ वर्षीय प्रीतीने महिलांच्या टी-३५ प्रकारात ही कामगिरी नोंदवली. मुख्य म्हणजे तिचे हे या स्पर्धेतील दुसरे पदक ठरले.

प्रीतीने काही दिवसांपूर्वीच १०० मीटर शर्यतीत कांस्यपदक पटकावले होते. सोमवारी तिने ३०.०१ सेकंदांत २०० मीटर अंतर गाठून तिसरा क्रमांक मिळवला. पॅरालिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी ती भारताची दुसरी महिला खेळाडू ठरली. यापूर्वी नेमबाज अवनी लेखराने अशी कामगिरी नोंदवली होती.

महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या समावेशाकडे लागले लक्ष... युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू

IND vs ENG 2025 : क्रिकेटच्या पंढरीत भारताची कसोटी! लॉर्ड्स स्टेडियमवर आजपासून तिसरा सामना, मालिकेत आघाडी घेण्याचे लक्ष्य

लैंगिक छळाच्या तक्रारीनंतर केलेली बदली रद्द; सहाय्यक प्राध्यापक महिलेला उच्च न्यायालयाचा दिलासा

भारतीय वंशाचे सबिह खान Apple चे नवे COO; लवकरच घेणार जेफ विल्यम्स यांची जागा

हॉटेल उद्योगावर मंदीचे सावट; शुल्क कमी न केल्यास ‘हॉटेल बंदचा’ व्यावसायिकांचा इशारा