संग्रहित फोटो
क्रीडा

Paralympic Games Paris 2024: नेमबाजीत सुवर्णकन्या अवनी लेखरा अंतिम फेरीत

Avani Lekhara: सुवर्णकन्या अवनी लेखराने मंगळवारी नेमबाजीतील आणखी एका प्रकाराची अंतिम फेरी गाठून पदकासाठी दावेदारी केली आहे.

Swapnil S

पॅरिस : सुवर्णकन्या अवनी लेखराने मंगळवारी नेमबाजीतील आणखी एका प्रकाराची अंतिम फेरी गाठून पदकासाठी दावेदारी केली आहे.

महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन्समधील एसएच १ प्रकारात अवनीने सातवे स्थान मिळवले. तिने एकूण १,१५९ गुण कमावले. याच प्रकारात भारताची अन्य स्पर्धक मोना अगरवालला मात्र अंतिम फेरी गाठता आली नाही. मोनाने १,१४७ गुणांसह १३वा क्रमांक मिळवला. आघाडीचे ८ स्पर्धक अंतिम फेरीसाठी पात्र ठरले आहेत.

२२ वर्षीय अवनीने यापूर्वी महिलांच्या एकेरीत सुवर्णपदक पटकावून इतिहास रचला. ती सलग दोन सुवर्ण जिंकणारी भारताची पहिली क्रीडापटू ठरली होती. त्यामुळे अवनीकडून पुन्हा पदक अपेक्षित आहे.

Maratha Reservation : ''मराठा-कुणबी एकच, जीआरशिवाय उपोषण थांबणार नाही''; शिंदे समितीशी चर्चा : मनोज जरांगे ठाम

Maratha Reservation : शिंदे समितीची मनोज जरांगे यांच्याशी चर्चा; मराठा आरक्षणावर निर्णायक टप्पा?

Maratha Reservation : मराठा वादळाने मुंबईला हादरा; आता माघार नाही – मनोज जरांगेंचा निर्धार; पावसामुळे आंदोलकांचे प्रचंड हाल

मुंबईला पावसाने झोडपले; पुढील तीन दिवस मध्यम पावसाची शक्यता

महायुतीच्या घोडचुकीमुळे मुंबईकर वेठीस; मराठा आंदोलनामुळे मुंबईत गोंधळाची स्थिती