X
क्रीडा

Paralympic Games Paris 2024: थाळीफेकीत योगेशला रौप्य

Yogesh Kathuniya: पुरुषांच्या थाळीफेकीतील एफ-५६ प्रकारात भारताच्या योगेश कथुनियाने रौप्यपदक कमावले. त्याचे हे सलग दुसरे पॅरालिम्पिक पदक ठरले.

Swapnil S

पॅरिस : पुरुषांच्या थाळीफेकीतील एफ-५६ प्रकारात भारताच्या योगेश कथुनियाने रौप्यपदक कमावले. त्याचे हे सलग दुसरे पॅरालिम्पिक पदक ठरले.

२७ वर्षीय योगेशने ४२.२२ मीटर अंतरावर थाळीफेक केली. त्याची ही हंगामातील सर्वोत्तम कामगिरी ठरली. पहिल्याच प्रयत्नात योगेशने इतके थाळीफेक करून आघाडी मिळवली. ब्राझीलच्या बटिस्टाने सलग तिसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकताना ४६.८६ मीटर अंतरावर थाळीफेक केली. एफ-५६ प्रकारात स्नायू कमकुवत तसेच पायाच्या भागात अपंगत्व असलेले खेळाडू सहभागी होतात.

“गेल्या काही स्पर्धांपासून मी सातत्याने रौप्यपदकच जिंकत आहे. त्यामुळे आता पदकाचा रंग सोनेरी करण्यासाठी मी अथक परिश्रम घेईन. देशासाठी सलग दुसऱ्यांदा पॅरालिम्पिक पदक जिंकल्याचा आनंद आहे,” असे योगेश म्हणाला. योगेशने २०२३ व २०२४च्या जागतिक स्पर्धेतसुद्धा या प्रकारात रौप्यपदकच पटकावले होते.

मराठवाड्यात कोसळधार! ढगफुटी सदृश्य पावसाने गावांचा संपर्क तुटला, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान

Thane First Metro : ठाणे मेट्रो प्रकल्पाची पहिली चाचणी यशस्वी; कशी आहे ठाणेकरांची पहिली मेट्रो, जाणून घ्या

मुंब्रा बायपासवर भीषण अपघात; कंटेनर ट्रकची दुचाकीला धडक, ३ तरुणांचा मृत्यू

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला सुप्रीम कोर्टाचा दणका; २०० कोटींच्या फसवणूक प्रकरणात दिलासा नाही

कारचालकाने अचानक ब्रेक दाबला अन्...; मुलुंड टोलनाक्याजवळ अपघात, ८ ते ९ वाहने एकमेकांना आदळली