पॅरिस : टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक प्राप्त केल्यावर भारताची वेटलिफ्टर मीराबाई चानू बुधवारी पदकाचा रंग सोनेरी करण्यासाठी सर्वस्व पणाला लावेल.
महिलांच्या ४९ किलो वजनी गटात मीराबाई सहभागी होणार आहे. चार वर्षांपूर्वी मीराबाईने २०२ किलो वजन उचलले होते. २०२२च्या राष्ट्रकुलमध्ये मीराबाईने २०१ किलो वजन उचलून पदक पटकावले. मात्र त्यानंतर दुखापतीमुळे मीराबाईला संघर्ष करावा लागला. आता मीराबाईला भारतासाठी वेटलिफ्टिंगमध्ये दोन पदके जिंकणारी पहिली खेळाडू ठरण्याची सुवर्णसंधी आहे. रात्री ११ वाजता मीराबाईच्या फेरीला प्रारंभ होईल. तिला गतविजेती होऊ झिहूईकडून कडवे आव्हान लाभेल. वेटलिफ्टिंगमध्ये प्रत्येक देशाच्या एकाच खेळाडूला सहभागी होता येते. त्यामुळे मीराबाईकडून यंदा देशाला पदक अपेक्षित आहे.