क्रीडा

Paris Olympics 2024: उपांत्यपूर्व फेरीत ग्रेट ब्रिटनशी भारत भिडणार

Indian Hockey Team: ऑस्ट्रेलियावर दमदार विजय मिळवल्यानंतर भारतीय पुरुष हॉकी संघाचा आत्मविश्वास उंचावला असून आता रविवारी होणाऱ्या उपांत्यपूर्व फेरीत भारतीय संघ ग्रेट ब्रिटनशी दोन हात करेल.

Swapnil S

पॅरिस : ऑस्ट्रेलियावर दमदार विजय मिळवल्यानंतर भारतीय पुरुष हॉकी संघाचा आत्मविश्वास उंचावला असून आता रविवारी होणाऱ्या उपांत्यपूर्व फेरीत भारतीय संघ ग्रेट ब्रिटनशी दोन हात करेल. ब गटातील शेवटच्या साखळी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर ३-२ अशी सरशी साधली. १९७२च्या म्युनिच ऑलिम्पिक स्पर्धेनंतर भारताचा हा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला विजय ठरला. या विजयामुळे भारत गटात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला.

भारताने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. न्यूझीलंडविरुद्ध ३-२ असा विजय मिळवल्यानंतर भारताने बलाढ्य अर्जेंटिनाविरुद्ध १-१ अशी बरोबरी पत्करली होती. त्यानंतर भारताने आयर्लंडविरुद्ध २-० असा विजय मिळवल्यानंतर आयर्लंडकडून १-२ अशा पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र ऑस्ट्रेलियावर विजय मिळवल्यानंतर आता भारताचे हौसले बुलंद आहेत.

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार