क्रीडा

India at Olympics, Day 3 Full Schedule: रमिता जिंदाल, अर्जुन बबुता साधणार मेडलवर 'नेम'? बघा भारताचे आजचे वेळापत्रक

भारताची २२ वर्षीय नेमबाज मनू भाकरने रविवारी पॅरिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी कांस्य पदकाला गवसणी घालत कोट्यवधी भारतीयांची मने तर जिंकलीच शिवाय स्पर्धेत भारताच्या पदकांचे खातेही उघडले.

Swapnil S

भारताची २२ वर्षीय नेमबाज मनू भाकरने रविवारी पॅरिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी कांस्य पदकाला गवसणी घालत कोट्यवधी भारतीयांची मने तर जिंकलीच शिवाय स्पर्धेत भारताच्या पदकांचे खातेही उघडले. देशासाठी ऑलिम्पिक पदक जिंकणारी ती पहिलीच महिला नेमबाज ठरली. त्यानंतर आज महिलांच्या १० मीटर रायफल प्रकारात रमिता जिंदाल आणि पुरूष एकेरीच्या १० मीटर रायफल प्रकारात अर्जुन बबुतालाही पदक जिंकण्याची संधी आहे. बघूया भारताचे आजचे ऑलिम्पिकमधील वेळापत्रक :

आजचे वेळापत्रक

नेमबाजी

महिला एकेरी अंतिम फेरी

रमिता जिंदाल (१० मीटर रायफल)

(दुपारी १ वा.)

पुरुष एकेरी अंतिम फेरी

अर्जुन बबुता (१० मीटर रायफल)

(दुपारी ३.३० वा.)

१० मीटर एअर पिस्तूल (मिश्र सांघिक पात्रता फेरी)

मनू भाकर आणि सरबजोत सिंग

रिदम सांगवान आणि अर्जून चीमा

(दुपारी १२.४५ वा.)

ट्रॅप (पुरुष एकेरी)

पृथ्वीराज तोंडाइमन

(दुपारी १ वा.)

तिरंदाजी

पुरुष गट उपांत्यपूर्व फेरी

भारत वि. तुर्कीए/कोलंबिया

(सायंकाळी ६.३० वा.)

बॅडमिंटन

पुरुष दुहेरी साखळी सामना

सात्विक-चिराग वि. मार्क-मार्व्हिन

(दुपारी १२ वा.)

महिला दुहेरी साखळी सामना

अश्विनी-तनिषा वि. नामी-चिहारू

(दुपारी १२.५० वा.)

पुरुष एकेरी साखळी सामना

लक्ष्य सेन वि. जुलियन

(सायंकाळी ५.३० वा.)

हॉकी

पुरुषांचा ब-गट साखळी सामना

भारत वि. अर्जेंटिना

(दुपारी ४.१५ वा.)

टेबल टेनिस

महिला एकेरी दुसरी फेरी

श्रीजा अकुला वि. जियान झेंग

(रात्री ११.३० वा.)

संकटग्रस्त बळीराजाला २,२१५ कोटींची मदत; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

बेकायदा होर्डिंगवर कारवाईसाठी लवकरच नोडल यंत्रणा उभारणार; भोसले समितीचा अहवाल मंत्रिमंडळाने स्वीकारला

‘शहद’ऐवजी आता फक्त ‘शहाड’ स्टेशन! राज ठाकरेंच्या संतापानंतर रेल्वे प्रशासनाचा झपाट्याने निर्णय

सव्वाअकरा लाखांचे पक्षी चोरणारे अटकेत; कर्जत पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

Mumbai Traffic : मुंबईत ठिकठिकाणी वाहतूककोंडी, नागरिक हैराण