क्रीडा

महिला वॉल्ट फायनलमध्ये प्रणती नायक पाचव्या स्थानावर

प्रणती नायकने वॉल्टच्या आपल्या पहिल्या प्रयत्नात १३.६३३ आणि दुसऱ्या प्रयत्नात ११.७६६ इतक्या स्कोअरची नोंद केली

वृत्तसंस्था

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सोमवारी कलात्मक जिम्नॅस्टिक स्पर्धेच्या महिला वॉल्ट फायनलमध्ये प्रणती नायक पाचव्या स्थानावर राहिली.

आशियाई चॅम्पियनशिपमध्ये (२०१९ आणि २०२२) मध्ये दोन वेळा कांस्यपदक जिंकणारी पश्चिम बंगालची २७ वर्षीय प्रणती नायकने वॉल्टच्या आपल्या पहिल्या प्रयत्नात १३.६३३ आणि दुसऱ्या प्रयत्नात ११.७६६ इतक्या स्कोअरची नोंद केली.

तिचा सरासरी स्कोअर १२.६९९ इतका राहिला. पात्रता फेरीत १३.२७५ गुण मिळविणाऱ्या प्रणतीला तिच्या दोन प्रयतनात ०.१ आणि ०.३ गुणांचा दंड आकारण्यात आला. ऑस्ट्रेलियाच्या जॉर्जिया गॉडविनने १३.२३३ स्कोअरची नोंद करत सुवर्णपदक पटकाविले. कॅनडाच्या लॉरी डेनोमीने आणि स्कॉटलंडच्या शॅनन आर्चरने अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक पटकाविले.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत