ANI
क्रीडा

पीटी उषा यांनी ‘त्या’ घटनेचे राजकारण केले, विनेश फोगटचा आरोप

भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ५० किलो महिला कुस्ती स्पर्धेत दमदार खेळ करत अंतिम फेरी गाठण्याचा विक्रम नोंदविला.

Swapnil S

कर्नाल : भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ५० किलो महिला कुस्ती स्पर्धेत दमदार खेळ करत अंतिम फेरी गाठण्याचा विक्रम नोंदविला. मात्र अंतिम सामन्याआधी १०० ग्रॅमने तिचे वजन अधिक भरल्यामुळे अंतिम सामन्यासाठी तिला अपात्र ठरविण्यात आले. यानंतर विनेश फोगट कोलमडून पडली होती. क्रीडाग्राममधील रुग्णालयात दाखल केले असताना, मला भेटायला आलेल्या भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पीटी उषा यांनी त्या घटनेचे राजकारण केले, असा खळबळजनक आरोप विनेश फोगट हिने केला आहे.

पीटी उषा यांनी तिची रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती. या भेटीचा फोटो त्यावेळी समोर आला होता. पीटी उषा यांनी मला न विचारता, गुपचूप फोटो काढला, असा आरोप विनेश फोगटने केला आहे.

विनेश फोगट म्हणाली की, ऑलिम्पिकमध्ये वजन अधिक भरल्यानंतर जो गोंधळ निर्माण झाला, त्यादरम्यान पीटी उषा यांनी कोणतीही मदत केली नाही. मात्र नंतर त्यांनी सोशल मीडियावर असा भास निर्माण केला की, त्या खेळाडूंच्या पाठिशी आहेत. मला ऑलिम्पिकमध्ये कोणते सहकार्य मिळाले, हा प्रश्न आता पडला आहे. पीटी उषा मला भेटायला आल्या, त्यांनी एक फोटो घेतला आणि त्यानंतर बंद दाराआड राजकारण शिजले. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बरेच राजकारण घडले. त्यामुळेच मला खूप धक्का बसला. अनेक लोक मला म्हणतात की, कुस्ती सोडू नको. पण कोणत्या कारणासाठी मी कुस्ती सुरू ठेवायची? प्रत्येक क्षेत्र आता राजकारणाने व्यापले आहे,” असा आरोप विनेश फोगटने केला.

विनेश फोगट पुढे म्हणाली, “जेव्हा तुम्ही रुग्णालयात बेडवर निपचित पडलेले असता, तेव्हा बाहेरच्या जगात काय चालले आहे, याची कल्पना नसते. तेव्हा तुम्ही आयुष्याच्या कठीण काळातून मार्गक्रमण करत असता. अशावेळी तुम्ही फक्त एकदा भेटायला येऊन फोटो काढता आणि सोशल मीडियावर असे भासवता की, तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहात. पाठिंबा दर्शविण्याचा हा कोणता मार्ग आहे? तुम्ही या पेक्षा अधिक करू शकला असता.”

अदानी पुन्हा गोत्यात; सौरऊर्जा कंत्राट मिळविण्यासाठी दिली 2000 कोटींची लाच, अमेरिकेतील कोर्टात आरोप

मुख्यमंत्रीपदावरून रणकंदन! महायुतीत फडणवीस, शिंदे, अजित पवारांच्या नावाचे दावे

अपक्ष, बंडखोरांवर सत्ता स्थापनेची मदार; महायुती व मविआची जोरदार मोर्चेबांधणी

रशियाचा युक्रेनवर आंतरखंडीय क्षेपणास्त्राने हल्ला

कोल्हापूरच्या चेतन पाटीलला जामीन मंजूर; जयदीप आपटेच्या जामिनावर सोमवारी सुनावणी