Photo : X (devendra fadanvis)
क्रीडा

पुणे ग्रँड टूर सायकलिंग स्पर्धेची घोषणा

भारताच्या पहिल्या व्यावसायिक प्रो स्टेज एलीट पुरुष सायकलिंग स्पर्धा या आंतरराष्ट्रीय सायकलिंग इव्हेंटचे अधिकृत चिन्ह आणि शुभंकराचे अनावरण उत्साही नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आले. या सोबतच पुणे ग्रँड टूर २०२६ या भारतातील पहिल्या जागतिक पातळीच्या सायकलिंग स्पर्धेची घोषणा करण्यात आली.

Swapnil S

पुणे : भारताच्या पहिल्या व्यावसायिक प्रो स्टेज एलीट पुरुष सायकलिंग स्पर्धा या आंतरराष्ट्रीय सायकलिंग इव्हेंटचे अधिकृत चिन्ह आणि शुभंकराचे अनावरण उत्साही नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आले. या सोबतच पुणे ग्रँड टूर २०२६ या भारतातील पहिल्या जागतिक पातळीच्या सायकलिंग स्पर्धेची घोषणा करण्यात आली.

पुणे ग्रँड टूर ही स्पर्धा २०२८ मध्ये होणाऱ्या उन्हाळी ऑलिंपिकसाठी पात्रता फेरी म्हणून स्विकारली जाणार आहे. या अंतर्गत आंतरराष्ट्रीय खेळाडूंना १९ ते २३ जानेवारी २०१६ दरम्यान आयोजित पाच दिवसीय, अनेक टप्प्यांची शर्यत पूर्ण करून महत्त्वाचे रेस पॉइंट्स मिळवण्याची संधी मिळणार आहे.

या प्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया, क्रीडा व युवक कल्याण विभाग आणि पुणे जिल्हा प्रशासन यांनी एकत्रितपणे महाराष्ट्रात आणि भारतात सायकलिंग क्रांती घडवण्याची वचनबद्धता व्यक्त केली.

वार्षिक कॅलेंडरमध्ये ‘एलीट इव्हेंट’ म्हणून वर्गीकृत असलेली पुणे ग्रँड टूर ही भारतासाठी जागतिक क्रीडा मंचावर सहभागी होण्याची ऐतिहासिक घटना आहे. ४३७ किमीच्या मार्गावर आधारित ही स्पर्धा पुणे जिल्ह्याच्या शहरी भाग, डोंगराळ परिसर आणि ग्रामीण रस्त्यांचा संगम दाखवणारा एक भव्य अनुभव आहे. भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे आणि एक आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळे आपल्या क्रीडा क्षमतेचे दर्शन घडवण्याची ही योग्य वेळ आहे.

“भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेचे आयोजन पुण्यात होत आहे. ही आपल्या सर्वांसाठी एक ऐतिहासिक घटना आहे. पुणे ग्रँड टूर हे महाराष्ट्राच्या क्रीडा दृष्टिकोणाचे प्रतीक आहे. आमचा उद्देश क्रीडा क्षेत्रासाठी आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करणे आणि सायकलिंगसारख्या खेळांना नवसंजीवनी देणे आहे. या उपक्रमातून भारतातील तरुण सायकलपटूंना प्रोत्साहन मिळेल आणि आपल्या नव्या राष्ट्रीय सायकलपटूंची निर्मिती होईल,” असे फडणवीस म्हणाले.

या प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “सायकलिंग हा केवळ एक खेळ नाही. ती एक जागतिक चळवळ आहे. मात्र भारत अद्याप या जागतिक समुदायाचा भाग झालेला नाही. त्यामुळे आजचा दिवस केवळ पुण्यासाठीच नाही तर महाराष्ट्र आणि भारतासाठीही ऐतिहासिक आहे. आज आपण जगातील सायकलिंग समुदायात सामील होण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे.”

New Rules From November 1: उद्यापासून बँकिंग, GST, आधार आणि पेन्शनमध्ये मोठे बदल; तुमच्यावर कसा होणार परिणाम? जाणून घ्या

Powai Hostage Case : 'तो आधी फ्रेंडली होता, नंतर...'; ओलिस ठेवलेल्या मुलीने सांगितला घटनेचा थरार

कल्याणमध्ये ३० वर्षांपासून राहणाऱ्या नेपाळी महिलेचा पर्दाफाश; भारतीय कागदपत्रांसह मुंबई विमानतळावर घेतले ताब्यात

Thane News : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा; उद्या अनेक भागांतील पाणीपुरवठा बंद

व्यक्तिगत फ्लॅटधारकांना मालमत्ता पत्रिका मिळणार; राज्य सरकारचा लवकरच निर्णय