क्रीडा

रणजी करंडक स्पर्धेसाठी रहाणेकडे मुंबईचे नेतृत्व; पृथ्वी शॉ काही लढतींनंतर परतणार

५ जानेवारीपासून रणजी स्पर्धेला प्रारंभ होणार असून एकूण ३८ संघ यामध्ये सहभागी होतील.

Swapnil S

मुंबई : आगामी रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेकडे मुंबईचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. युवा पृथ्वी शॉ पहिल्या दोन लढतींसाठी अनुपलब्ध असून त्यानंतर तो परतणार असल्याचे समजते.

५ जानेवारीपासून रणजी स्पर्धेला प्रारंभ होणार असून एकूण ३८ संघ यामध्ये सहभागी होतील. ३८ संघांची पाच गटांत विभागणी करण्यात आली असून यांपैकी चार एलिट गटांत प्रत्येकी ८ संघ असतील, तर उरलेल्या पाचव्या प्लेट गटात सहा संघांचा समावेश असेल. मुंबईचा ब-गटात समावेश करण्यात आला असून ते ५ जानेवारीपासून बिहारविरुद्ध पहिला साखळी सामना खेळतील. मुंबईच्या गटात बिहार, आंध्र प्रदेश, बंगाल, आसाम, छत्तीसगड, केरळ व उत्तर प्रदेश या अन्य सात संघांचा समावेश आहे.

मुंबईचा संघ

अजिंक्य रहाणे (कर्णधार), जय बिस्ता, भुपेन लालवाणी, हार्दिक तामोरे, सर्फराझ खान, शिवम दुबे, सुवेद पारकर, प्रसाद पवार, शम्स मुलानी, तनुष कोटियन, तुषार देशपांडे, धवल कुलकर्णी, मोहित अवस्थी, रॉयस्टन डायस, अथर्व अंकोलेकर.

मुंबई ते नवी मुंबई विमानतळ थेट मेट्रोने जोडणार; सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अश्विन मुदगल यांची माहिती

पुणे पुन्हा हादरले! जुन्नरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून; मुलीचा शोध घेण्याचा आरोपीने केला बनाव

BMC सफाई कर्मचाऱ्यांच्या मोफत घरांचा प्रश्न ऐरणीवर; उपलब्ध जमिनीचा विस्तृत तपशील सादर करण्याचे हायकोर्टाचे आदेश

घरगुती PNG वापराला प्रोत्साहन; सरकार शहर वायू वितरण कंपन्यांना अतिरिक्त गॅस देणार

Mumbai : ६३८ आस्थापनांना न्यायालयात खेचले; मराठी पाट्यांकडे दुर्लक्ष भोवले; शॉपिंग मॉल, नामांकित आस्थापना रडारवर