क्रीडा

आवेश, महाराजच्या गोलंदाजीने राजस्थानला तारले

आवेश आणि महाराज यांनी पंजाबच्या फलंदाजांवर अंकुश ठेवत प्रत्येकी दोन विकेट्स मिळवले. आशुतोष शर्मा (३१), जितेश शर्मा (२९) आणि लियाम लिव्हिंगस्टोन (२१) यांनी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला, पण पंजाबला दीडशे धावांपलीकडे मजल मारता आली नाही.

Swapnil S

मुल्लानपूर (चंडीगढ) : वेगवान गोलंदाज आवेश खान आणि फिरकीपटू केशव महाराज यांची जादू पंजाब किंग्जविरुद्ध चालली. या दोघांच्या अचूक गोलंदाजीमुळे राजस्थान रॉयल्सने पंजाबला ८ बाद १४७ धावांवरच रोखले.

आवेश आणि महाराज यांनी पंजाबच्या फलंदाजांवर अंकुश ठेवत प्रत्येकी दोन विकेट्स मिळवले. आशुतोष शर्मा (३१), जितेश शर्मा (२९) आणि लियाम लिव्हिंगस्टोन (२१) यांनी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला, पण पंजाबला दीडशे धावांपलीकडे मजल मारता आली नाही.

कर्णधार शिखर धवनच्या जागी संधी मिळालेल्या अथर्व तायडे याने पंजाबला चांगली सुरुवात करून दिली. त्याने कुलदीप सेनला चौकार ठोकत ३ षटकांत २६ धावा जमवून दिल्या. आवेशने अथर्वचा (१५) अडसर दूर केल्यानंतर जॉनी बेअरस्टो (१५) हासुद्धा झटपट बाद झाला. प्रभसिमरन सिंग (१०) आणि सॅम करण (६) हेसुद्धा माघारी परतल्यामुळे पंजाबची अवस्था ४ बाद ५२ अशी झाली होती. तळाच्या जितेश शर्मा, लिव्हिंगस्टोन आणि आशुतोष यांनी चांगली फलंदाजी केल्यामुळे पंजाबला सन्मानजनक धावसंख्या रचता आली. राजस्थानकडून ट्रेंट बोल्ट, कुलदीप सेन, यजुर्वेंद्र चहल यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.

आयपीएल गुणतालिका

संघ - सामने - जय - पराजय - गुण - धावगती

  • राजस्थान - ५ - ४ - १ - ८ - ०.८७१

  • कोलकाता - ४ - ३ - १ - ६ - १.५२८

  • चेन्नई - ५ - ३ - २ - ६ - ०.६६६

  • लखनऊ - ५ - ३ - २ - ६ - ०.४३६

  • हैदराबाद - ५ - ३ - २ - ६ - ०.३४४

  • गुजरात - ६ - ३ - ३ - ६ - -०.६३७

  • मुंबई - ५ - २ - ३ - ४ - -०.०७३

  • पंजाब - ५ - २ - ३ - ४ - -०.१९६

  • दिल्ली - ६ - २ - ४ - ४ --०.९७५

  • बंगळुरू - ६ - १ - ५ - २ --१.१२४

(लखनऊ वि. दिल्ली सामन्यापर्यंत)

महाराष्ट्र प्रशासनात मोठा बदल; राजेश अग्रवाल यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती

निवडणुका होणारच, पण...; सर्वोच्च न्यायालयाचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर मोठा निर्णय

२ डिसेंबरच्या निवडणुकांसाठी सरकारचा निर्देश : मतदारांना भरपगारी रजा द्या, अन्यथा ...

Mumbai : बांधकाम प्रदूषणावर हायकोर्टाची कठोर भूमिका; नियमांच्या अंमलबजावणीसाठी नेमली ५ सदस्यांची समिती

तुम्हीही रेल्वेने प्रवास करताय? मग 'हे' नवे नियम आधीच जाणून घ्या; सर्व प्रवाशांसाठी अनिवार्य!