क्रीडा

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : रहाणे, ऋतुराजचा शतकी नजराणा

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत शनिवारपासून सर्व गटांतील दुसऱ्या साखळी सामन्यांना प्रारंभ झाला. त्यांपैकी मुंबईसाठी अनुभवी माजी कर्णधार अजिंक्य रहाणेने (२३७ चेंडूंत ११८ धावा), तर महाराष्ट्रासाठी प्रतिभावान ऋतुराज गायकवाडने (१६३ चेंडूंत ११६ धावा) शतक साकारून आपापल्या संघाला उत्तम सुरुवात करून दिली.

Swapnil S

मुंबई : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत शनिवारपासून सर्व गटांतील दुसऱ्या साखळी सामन्यांना प्रारंभ झाला. त्यांपैकी मुंबईसाठी अनुभवी माजी कर्णधार अजिंक्य रहाणेने (२३७ चेंडूंत ११८ धावा), तर महाराष्ट्रासाठी प्रतिभावान ऋतुराज गायकवाडने (१६३ चेंडूंत ११६ धावा) शतक साकारून आपापल्या संघाला उत्तम सुरुवात करून दिली. १५ ऑक्टोबरपासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रतिष्ठेचे स्थान असलेल्या रणजी स्पर्धेच्या ९१व्या हंगामाला प्रारंभ झाला. गतवर्षीप्रमाणे यावेळीसुद्धा रणजी स्पर्धा दोन टप्प्यांत खेळवण्यात येईल. या स्पर्धेचा पहिला टप्पा १५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या काळात होईल. मग दरम्यानच्या काळात विजय हजारे एकदिवसीय स्पर्धा व सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धा रंगेल. त्यानंतर २२ जानेवारीपासून रणजीचा दुसरा टप्पा सुरू होईल. २८ फेब्रुवारीला रणजी स्पर्धा संपन्न होईल.

गतवेळेस विदर्भाने केरळला नमवून तिसऱ्यांदा रणजी करंडक उंचावला होता. त्यामुळे त्यांच्यापुढे जेतेपद टिकवण्याचे आव्हान असेल. स्पर्धेत यंदाही ३८ संघांचा समावेश असून त्यांपैकी ३२ संघांची चार एलिट गटात (एका गटात आठ संघ), तर उरलेल्या ६ संघांची प्लेट गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटातून दोन संघ उपांत्यपूर्व फेरी गाठतील.

दरम्यान, ड-गटात पहिल्या लढतीत मुंबईने जम्मू आणि काश्मीरला नमवले. शनिवारपासून मग छत्तीसगडविरुद्ध सुरू झालेल्या दुसऱ्या साखळी सामन्यातील पहिल्या दिवसअखेर मुंबईने ८४ षटकांत ५ बाद २५१ धावा केल्या आहेत. बीकेसी येथे सुरू असलेल्या या लढतीत शम्स मुलानी २५, तर आकाश रणधर्धा आहे. अजिंक्यने प्रथम आनंद शून्यावर नाबाद श्रेणी कारकीर्दीतील ४२वे शतक साकारले. त्याला सिद्धेश लाडची (८०) उत्तम साथ लाभली. सर्फराझ खानने (१) निराशा केली.

दुसरीकडे, महाराष्ट्राने ब-गटात चंदीगडविरुद्ध पहिल्या दिवसअखेर ८५.५ षटकांत सर्व बाद ३१३ धावा केल्या. पृथ्वी शॉ (८) व कर्णधार अंकित बावणे (८) दोघेही अपयशी ठरल्यानंतर ऋतुराजने १५ चौकारांसह शतक साकारून संघाला सावरले. त्याला सौरभनवाले (६६) व अर्शीन कुलकर्णी (५०) यांची सुरेख साथ लाभली.

लाडकी बहीण योजनेत १८ नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण करणे अनिवार्य

बांगलादेशात कांद्याचे भाव शंभरी पार; भारतीय निर्यातदारांकडून आयातबंदी उठवण्याची मागणी

सेव्हन हिल्स रुग्णालयावरून वातावरण तापले! अंधेरी येथील रुग्णालय खासगी उद्योगपतीला विकण्यास नागरिकांचा विरोध

सरकारी बँकांनी धोरण बदलावे; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी टोचले कान

कर्जमुक्ती मिळेपर्यंत ‘मतबंदी’चा मार्ग अवलंबा; पार्डीतील शेतकऱ्यांना उद्धव ठाकरे यांचे आवाहन