Ravichandran Ashwin breaks Anil Kumbles record  
क्रीडा

इंग्लंडच्या फलंदाजांना आश्विनच्या फिरकीनं गुंडाळलं, दिग्गज अनिल कुंबळेचा विक्रम मोडला; पाहा Video

Naresh Shende

फिरकी गोलंदाज आर आश्विन भारताच्या हुकमी गोलंदाजांपैकी एक मानला जातो. आपल्या दांडग्या अनुभवाच्या जोरावर आश्विन भल्या भल्या फलंदाजांच्या दांड्या गुल करतो. अशाच प्रकारचा कारनामा त्याने रांचीत सुरु असलेल्या भारत विरुद्ध इंग्लंडच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात केला आहे. आश्विनने टीम इंडियाचा माजी दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळेचा विक्रम मोडला आहे. दोन चेंडूवर इंग्लंडच्या दोन फलंदाजांना बाद करत आश्विनने या ऐतिहासिक विक्रमाला गवसणी घातली आहे. दरम्यान, भारताच्या गोलंदाजांनी भेदक मारा करून इंग्लंडच्या सर्व फलंदाजांना १४५ धावांवर गारद केलं. त्यामुळे इंग्लंडने भारताला तिसरा कसोटी सामना जिंकण्यासाठी १९२ धावांचं आव्हान दिलं आहे.

आर आश्विनने या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात २ विकेट्स घेतले. त्यामुळे भारतासाठी कसोटीत ३५१ विकेट्स घेण्याचा पराक्रम त्याने केला आहे. तसंच टीम इंडियासाठी सर्वाधिक विकेट्स घेण्याची नोंदही आश्विनच्या नावावर झालीय. विशेष म्हणजे त्याने अनिल कुंबळेचा विक्रम मोडला असून ३५० हून अधिक विकेट्स घेणारा तो भारताचा पहिला गोलंदाज ठरला आहे. कुंबळेनं ६३ सामन्यांमध्ये ३५० विकेट्स घेतल्या आहेत. तर ५९ सामन्यांमध्ये आश्विनने ३५२ विकेट्स घेण्याचा ऐतिहासिक विक्रम केला आहे.

इथे पाहा आश्विनच्या फिरकीची जादू

आश्विनने तिसरा डाव सुरु असताना दोन चेंडूवर सलग दोन विकेट्स घेतल्या. त्याने बेन डकेटला १५ तर ओली पोपला शून्यावर बाद केलं. त्यानंतर त्याने ११ धावांवर असणाऱ्या जो रुटला बाद करुन त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

'या' खेळाडूंनी घेतले भारतासाठी सर्वाधिक कसोटी विकेट्स

आर आश्विन - ३५२

अनिल कुंबळे - ३५०

हरभजन सिंग - २६५

कपिल देव - २१९

रविंद्र जडेजा - २१०

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस