क्रीडा

कितीही बलाढ्य संघाला तोंड देण्यास सज्ज;मोहम्मद रिझवानची दर्पोक्ती

भारत-पाकिस्तान या दोन संघातील प्रत्येक सामना हा अंतिम सामन्यासारखा खेळला जातो.

वृत्तसंस्था

“जेव्हा भारत-पाकिस्तान यांच्यात सामना असतो, तेव्हा दोन्ही संघ सारख्याच दबावाखाली असतात. आगामी सामन्यासाठी आमच्या सर्वच खेळाडूंचा जबरदस्त आत्मविश्वास वाढला असून आम्ही कितीही बलाढ्य संघाला तोंड देण्यास सज्ज आहोत,” अशी दर्पोक्ती सामन्यापूर्वी पाकिस्तानचा आघाडीचा फलंदाज मोहम्मद रिझवानने केली. रिझवानने सांगितले की, “आम्ही आता कोणत्याही संघाशी दोन हात करण्याइतपत तयार आणि बलवान झालो आहोत.” भारत-पाकिस्तान या दोन संघातील प्रत्येक सामना हा अंतिम सामन्यासारखा खेळला जातो. त्यामुळे संपूर्ण जग या सामन्याची वाट पाहत असते. मोहम्मद रिझवानने हाँगकाँग-विरुद्धच्या सामन्यात धडाकेबाज फलंदाजी केली होती. त्याने ५७ चेंडूंमध्ये ७८ धावा केल्या होत्या. सहा चौकार आणि एक षट्कार यांच्या जोरावर त्याने ही धावसंख्या गाठली होती. या सामन्यात त्याने टी-२० सामन्यातील पाच हजार धावा पूर्ण केल्या.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत