शेष भारताची इराणी चषकावर मोहोर; रणजी विजेत्या जम्मू-काश्मीरवर मात  X - GreaterKashmir
क्रीडा

शेष भारताची इराणी चषकावर मोहोर; रणजी विजेत्या जम्मू-काश्मीरवर मात

वेगवान गोलंदाज मुकेश कुमार (३३ धावांत ६ बळी) आणि आकाश दीप यांच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर शेष भारताने रणजी करंडक विजेत्या जम्मू-काश्मीरचा १६७ धावांनी पराभव करत रविवारी इराणी कप जिंकला. कर्णधार ऋषभ पंतच्या वाढदिवशीच त्याच्या नेतृत्वात शेष भारताने जेतेपद मिळवले.

Swapnil S

श्रीनगर : वेगवान गोलंदाज मुकेश कुमार (३३ धावांत ६ बळी) आणि आकाश दीप यांच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर शेष भारताने रणजी करंडक विजेत्या जम्मू-काश्मीरचा १६७ धावांनी पराभव करत रविवारी इराणी कप जिंकला. कर्णधार ऋषभ पंतच्या वाढदिवशीच त्याच्या नेतृत्वात शेष भारताने जेतेपद मिळवले.

चौथ्या दिवशी विजयासाठी २७९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना जम्मू-काश्मीरचा संघ २७.३ षटकांत १११ धावांवर सर्वबाद झाला. जम्मू-काश्मीरला सामना अनिर्णित राखून पहिल्या डावातील ४१ धावांच्या आघाडीच्या बळावर विजेतेपद मिळवण्यासाठी केवळ खेळपट्टीवर टिकून राहायचे होते, परंतु मुकेशने ३३ धावा देत ६ बळी टिपत आणि आकाशने २ बळी घेत त्यांच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले.

तत्पूर्वी, शुभाश खजुरिया (३२) आणि कमरान इक्बाल (३२) यांनी ५४ धावांची ओपनिंग भागीदारी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, आकाशने इक्बालला पायचीत करत ही जोडी फोडली. त्यानंतर मुकेश कुमारने लंचपूर्वी शुभम पुंहीर आणि कर्णधार पारस डोगरा यांना लागोपाठच्या चेंडूवर बाद करत जम्मू-काश्मीरला मोठा धक्का दिला. उपाहाराच्या वेळेस जम्मू-काश्मीरची धावसंख्या १९ षटकांत ३ बाद ८९ अशी होती.

उपाहारानंतर पहिल्याच चेंडूवर आकाशने खजुरियाला बाद केले आणि त्यानंतर जम्मू-काश्मीरच्या डावाला भरकटत ९ षटकांत केवळ २२ धावांत त्यांचे उरलेले सहा गडी पटपट बाद झाले. याआधी, शेष भारताने कालच्या ३ बाद ३०८ धावसंख्येवरून पुढे खेळताना आपला दुसरा डाव ३१९ धावांवर संपवला. जम्मू-काश्मीरकडून उमर नाझीर, सुनील कुमार आणि साहिल लोत्रा यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले. मात्र शेष भारताच्या गोलंदाजांनी पुनरागमन करत सामना आपल्या नावावर केला.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

डिसेंबरपर्यंत उन्हाचे चटके बसणार! एल निनोची तीव्रता वाढणार, सरासरीपेक्षा अधिक तापमान राहणार

ज्ञानेश कुमार यांच्यावरील याचिकांवर आज सुनावणी

ज्ञानेशांविरोधात 'गर्जना'; सर्वपक्षीय मोर्च्यात राज्यातील SIR रद्द करण्याची मागणी

नागरिकांचे मत काढून घेणारी प्रक्रिया मनमानी; सर्वोच्च न्यायालयाचे न्या. उज्ज्वल भुयान यांची चपराक

GST अधिकाऱ्यांवर आता लागणार लगाम; जीएसटी अंमलबजावणीत व्यापक सुधारणा होणार