मुंबई इंडियन्सला दिशा देण्याची गरज : रोहित शर्मा 
क्रीडा

मुंबई इंडियन्सला दिशा देण्याची गरज : रोहित शर्मा

आयपीएल २०२६ मधील निराशाजनक कामगिरीनंतर मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदासाठी आपल्याशी संपर्क साधण्यात आला होता.

Swapnil S

मुंबई : आयपीएल २०२६ मधील निराशाजनक कामगिरीनंतर मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदासाठी आपल्याशी संपर्क साधण्यात आला होता. विचारविनिमयानंतर पाच वेळा विजेतेपद पटकावलेल्या या संघाला आवश्यक दिशा देण्याची जबाबदारी आपण स्वीकारली, असे रोहित शर्माने स्पष्ट केले.

मुंबई इंडियन्सने अखेरचे आयपीएल विजेतेपद २०२० मध्ये रोहितच्या नेतृत्वाखाली पटकावले होते. २०२४च्या हंगामापूर्वी हार्दिक पंड्याकडे कर्णधारपद सोपवण्यात आले होते. मात्र, हा निर्णय अपेक्षेप्रमाणे यशस्वी ठरला नाही. २०२६मध्ये मुंबई इंडियन्स नवव्या स्थानावर राहिल्यानंतर संघाचे मालक आकाश अंबानी यांच्याशी झालेल्या चर्चेचा उल्लेख करत रोहित म्हणाला, "सुरुवातीला माझी प्रामाणिक प्रतिक्रिया अशी होती की, सध्या मी यासाठी तयार नाही. गेल्या काही काळात बऱ्याच गोष्टी घडल्या होत्या. त्यामुळे मला पुन्हा विचार करावा लागला."

पोलार्डसोबत काम करण्यासाठी उत्सुक

मुंबई इंडियन्सचा दीर्घकाळ सहकारी राहिलेल्या किरॉन पोलार्डसोबत काम करण्यासाठी तो उत्सुक आहे. पोलार्डची मुख्य प्रशिक्षकपदी बढती करण्यात आली आहे. "पोलार्ड हा मुंबई इंडियन्सचा दिग्गज खेळाडू आहे, यात शंका नाही. अनेक वर्षे त्याने कठीण परिस्थितीत संघाला सावरले आहे. गेल्या काही वर्षांपासून तो फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम करत असल्याने संघातील घडामोडींची त्याला चांगली माहिती आहे. संघाचे महत्त्व, त्याची संस्कृती आणि मुंबई इंडियन्सकडून खेळण्याचा अर्थ त अर्थ त्याला समजतो," असे रोहित म्हणाला.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : १६ हजार बॅनर्सवर कारवाई; दीड महिन्यांत मात्र केवळ १७ जणांवर गुन्हे दाखल

महाविकास आघाडीत शरद पवार गट लक्ष्य; ठाकरे गट आणि काँग्रेसची जोरदार टीका

Mumbai : वांद्रे टर्मिनसवर ७५ दिवसांचा ब्लॉक

पूर्वसूचना न देता सरकारविरुद्ध दावा दाखल करता येणार नाही; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

जळगाव जिल्हा बँकेसाठी आज मतदान'; ९ जागांसाठी २९ उमेदवार; सोमवारी मतमोजणी