क्रीडा

रुद्रांक्ष-मेहुली यांचा सुवर्णवेध; आशियाई पात्रता नेमबाजी स्पर्धा

जकार्ता येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत सोमवारी भारताने चार सुवर्णपदक पटकावले होते. तसेच इशा सिंग व वरुण तोमर ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले

Swapnil S

जकार्ता : ठाण्याचा रुद्रांक्ष पाटील आणि बंगालची मेहुली घोष या दोघांनी मिळून भारतासाठी आशियाई ऑलिम्पिक पात्रता नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. या दोघांनीही पॅरिस ऑलिम्पिकमधील स्थान यापूर्वीच पक्के केले आहे. मात्र रुद्रांक्ष-मेहुलीच्या सुवर्ण यशामुळे भारताची या स्पर्धेतील पदक लयलूट सुरूच आहे.

जकार्ता येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत सोमवारी भारताने चार सुवर्णपदक पटकावले होते. तसेच इशा सिंग व वरुण तोमर ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले. भारताच्या आतापर्यंत १५ नेमबाजांनी ऑलिम्पिकचे तिकीट मिळवलेले आहे. मंगळवारी १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक प्रकारात मेहुली-रुद्रांक्ष यांनी अंतिम फेरीत चीनच्या शेन युफेई व झू मिंगशुयी यांना १६-१० अशी धूळ चारली. इलाव्हेनिल व अर्जुन बबुता यांना सहाव्या स्थानी समाधान मानावे लागले.

१० मीटर एअर पिस्तूल प्रकारातील मिश्र सांघिक गटात भारताच्या अर्जुन चीमा व रिदम सांगवान या जोडीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अंतिम फेरीत एकवेळ ९-८ असे आघाडीवर असतानाही त्यांनी व्हिएतनामच्या थू विन आणि क्वांग फाम यांच्याकडून ११-१७ असा पराभव पत्करला. पात्रता फेरीत अर्जुन व रिदम यांनी ५८२ गुणांसह अग्रस्थान मिळवले होते.

कनिष्ठ गटात एअर रायफल मिश्र सांघिक प्रकारात इशा टाकसळे व महेश मॅदनेनी यांनी सुवर्ण, तर अभिनव शॉ व अन्वी राठोड यांनी कांस्यपदक प्राप्त केले. त्यामुळे भारताने दिवसभरात चार पदके जिंकली.

हे नेमबाज ऑलिम्पिकला पात्र

रुद्रांक्ष पाटील, भोवनीश मेंदिराता, स्वप्निल कुसळे, अखिल शेरॉन, मेहुली घोष, सिफ्ट कौर सामरा, राजेश्वरी कुमारी, सरबजोत सिंग, अर्जुन बबुता, तिलोत्तमा सेन, मनू भाकर, अनिष भानवाला, श्रियांका सडंगी, वरुण तोमर, इशा सिंग.

एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल

''जर इथे येऊन धंदा करताय तर मराठी बोलायची लाज कसली?'' अभिनेते भरत जाधव यांचा संतप्त सवाल

गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष्ट्रात कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल

‘जय गुजरात’मुळे वादंग; अमित शहांपुढे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणेमुळे विरोधक संतप्त

हायकोर्टाची सुनावणी सोमवारपासून लाईव्ह; सुरुवातीला पाच न्यायमूर्तींचा समावेश