क्रीडा

ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रूपल चौधरीने पटकाविली दोन पदके

भारताचे बार्थ श्रीधर, प्रिया मोहन, कपिल आणि रूपल चौधरी यांनी तीन मिनिटे १७.७६ सेकंदात शर्यत पूर्ण करीत आशियाई ज्युनिअर विक्रम केला

वृत्तसंस्था

जागतिक अंडर-२० ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रूपल चौधरीने दोन पदके पटकाविली. या चॅम्पियनशिपमध्ये दोन पदके जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली. रूपलने पहिल्या ४X४०० मीटर रिले शर्यतीत रौप्यपदक मिळविले. त्यानंतर तिने महिलांच्या ४०० मीटर शर्यतीत कांस्यपदक पटकाविले.

भारताचे बार्थ श्रीधर, प्रिया मोहन, कपिल आणि रूपल चौधरी यांनी तीन मिनिटे १७.७६ सेकंदात शर्यत पूर्ण करीत आशियाई ज्युनिअर विक्रम केला. या शर्यतीनंतर रूपलने ४०० मीटर शर्यतीत कांस्यपदक पटकाविले. रूपलने ५१.८५ सेकंदात शर्यत पूर्ण केली.

रूपल उत्तर प्रदेशमधील मेरठ जिल्ह्यातील आहे. तिचे वडील शेती करतात. अवघ्या १७ वर्षांच्या रूपलने आतापर्यंत अनेक स्पर्धांमध्ये कमाल कामगिरी केली. तिने ज्युनिअर लेवलवर राष्ट्रीय स्पर्धांमध्येही अप्रतिम खेळ केला. रूपलच्या वडिलांनी सांगितले की, गावातील मुली या शर्यतीत भाग घेत नाहीत; पण रूपलने २०१६मध्ये अॅथलिट व्हायचे तिने ठरविले.

गावापासून जवळचे अॅथलेटिक्स स्टेडियम मेरठमध्ये होते.

Jharkhand Student Protest : भरती परीक्षांविरोधात आंदोलन; बॅरिकेड्स तोडून हजारो विद्यार्थ्यांचा विधानसभेवर मोर्चा, Video

किंमत तीच, वजन कमी! कच्च्या मालाच्या किमतीतील वाढीमुळे कंपन्यांपुढे पर्याय

पतीचा शोध घेत फ्लॅटवर पोहोचली, दुसऱ्या महिलेसोबत पाहताच राडा; दोघींची तुफान हाणामारी, VIDEO

कोल्हापूरची हद्दवाढ गरजेची; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

धावत्या ट्रेनमधून मोबाईल हिसकावला अन् प्रवाशाचा तोल गेला; CCTV मध्ये थरार कैद