जायबंदी परागऐवजी ऋतुराज उपकर्णधार; तिरंगी एकदिवसीय मालिकेसाठी भारत-अ संघात हर्षच्या जागी अनुकूलला स्थान 
क्रीडा

जायबंदी परागऐवजी ऋतुराज उपकर्णधार; तिरंगी एकदिवसीय मालिकेसाठी भारत-अ संघात हर्षच्या जागी अनुकूलला स्थान

श्रीलंकेत होणाऱ्या आगामी तिरंगी मालिकेसाठी भारत-अ संघात मोठा बदल करण्यात आला आहे. दुखापतग्रस्त रियान परागच्या जागी चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याचा संघात समावेश करण्यात आला असून, त्याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : श्रीलंकेत होणाऱ्या आगामी तिरंगी मालिकेसाठी भारत-अ संघात मोठा बदल करण्यात आला आहे. दुखापतग्रस्त रियान परागच्या जागी चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याचा संघात समावेश करण्यात आला असून, त्याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) यासंदर्भात अधिकृत घोषणा केली.

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार असलेला रियान पराग आयपीएल दरम्यान हॅमस्ट्रिंगच्या (स्नायूची दुखापत) समस्येशी झगडत होता. या दुखापतीमुळे त्याला पुनर्वसनासह (रिहॅबिलिटेशन) सुमारे तीन महिने क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहावे लागण्याची शक्यता आहे. परागच्या या पुनर्वसनाची संपूर्ण जबाबदारी बंगळुरू येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सेलन्स (सीओई) सांभाळणार आहे.

दरम्यान, भारत-अ, श्रीलंका-अ अफगाणिस्तान-अ या तीन संघांमधील ही त्रिकोणी मालिका ९ जूनपासून श्रीलंकेत सुरू होणार आहे. पुरुष निवड समितीने या आगामी दौऱ्यासाठी ऋतुराज गायकवाडची निवड करून त्याला संघात सामील केले आहे. प्रतिभावान तिलक वर्मा या मालिकेत भारताचे नेतृत्व करणार आहे. तसेच हर्ष दुबेचा भारताच्या कसोटी संघात समावेश करण्यात आल्याने त्याच्या जागी अन्य डावखुरा अष्टपैलू अनुकूल रॉयला संघात स्थान लाभले आहे.

भारत-अ संघ

तिलक वर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), प्रियांश आर्य, वैभव सूर्यवंशी, आयुष बदोनी, निशांत सिंधू, सुर्यांश शेडगे, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), कुमार कुशाग्र (यष्टीरक्षक), विप्रज निगम, यश ठाकूर, युद्धवीर सिंग, अंशुल कंबोज, अर्शद खान, अनुकूल रॉय.

देशांतर्गत हंगाम २३ ऑगस्टपासून

बीसीसीआयने आगामी २०२६-२७ च्या देशांतर्गत हंगामाचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. या आगामी नव्या हंगामात विविध वयोगट आणि वेगवेगळ्या स्वरूपातील पुरुष व महिला क्रिकेटच्या एकूण १,७८८ सामन्यांचा थरार पाहायला मिळणार आहे. पुरुष क्रिकेटमध्ये सीनियर, अंडर-२३, अंडर-१९ आणि अंडर-१६ या श्रेणींमध्ये स्पर्धा खेळवल्या जातील. यासोबतच महिला क्रिकेटमध्येही सीनियर, अंडर-२३, अंडर-१९ आणि अंडर-१५ वयोगटातील स्पर्धांसाठी व्यापक वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. भारतातील देशांतर्गत क्रिकेटचा दर्जा सातत्याने उंचावण्यासाठी आणि खेळाडूंना स्पर्धात्मक वातावरण देण्यासाठी बीसीसीआयने सविस्तर नियोजन केले आहे. या अंतर्गत लाल चेंडूच्या (रेड-बॉल) क्रिकेट हंगामाची सुरुवात २३ ऑगस्ट २०२६ पासून प्रतिष्ठेच्या दुलीप ट्रॉफीने होणार आहे. या स्पर्धेत सहा विभागीय संघ आमनेसामने असतील. यानंतर १ ऑक्टोबर २०२६ पासून इराणी कप स्पर्धेचा सामना खेळवला जाईल.

FSSAI चा दणका! दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींप्रकरणी नेस्ले, पेप्सिको, कोका-कोलासह मोठ्या ब्रँड्सना १५० हून अधिक नोटिसा

Toxic चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमात दुर्घटना; साउंड सिस्टम कोसळून ४ जण जखमी, Video

गर्दीच्या नियोजनासाठी उड्डाणपूल, दुभाजकांवर लोखंडी बॅरिकेड्सचे ग्रीन कव्हर; गणेशोत्सवात लालबाग-परळ परिसरात विशेष खबरदारी

Mumbai : गणपती आगमन मिरवणुकीला गालबोट! भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळून २ ठार, ५ जखमी; VIDEO

कुर्ला-वांद्रे पॉड टॅक्सी प्रकल्प: बांधकामावर स्वतंत्र अभियंता ठेवणार नजर; AI वर चालणाऱ्या ड्रायव्हरलेस यंत्रणेत असतील २२ स्थानके