क्रीडा

SA vs IND,1st T20 : सूर्यकुमारच्या शिलेदारांचा आज पहिला सामना; आयपीएलच्या लिलावापूर्वी लक्ष वेधण्याची सुवर्णसंधी

एकीकडे मायदेशातच भारताच्या कसोटी संघाव घरच्या मैदानात मालिका पराभवाची नामुष्की ओढवल्यावर आता गुरुवारपासून नव्या दमाच्या भारतीय टी-२० संघाकडे चाहत्यांचे लक्ष लागून असेल. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला टी-२० सामना खेळणार आहे.

Swapnil S

डर्बन : एकीकडे मायदेशातच भारताच्या कसोटी संघाव घरच्या मैदानात मालिका पराभवाची नामुष्की ओढवल्यावर आता गुरुवारपासून नव्या दमाच्या भारतीय टी-२० संघाकडे चाहत्यांचे लक्ष लागून असेल. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला टी-२० सामना खेळणार आहे.

उभय संघांत होणाऱ्या या चार लढतींच्या मालिकेद्वारे युवा खेळाडूंना आयपीएल लिलावापूर्वी संघमालकांचे लक्ष वेधण्याची उत्तम संधी आहे. मात्र डर्बन येथे होणाऱ्या पहिल्या लढतीवर पावसाचे सावट असेल. दिवसभरात ४० टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडविरुद्ध भारताने नुकताच ०-३ अशा फरकाने कसोटी मालिका गमावली. त्यामुळे या पराभवातून सावरणे खेळाडूंसह चाहत्यांनाही अवघड जाणार, हे निश्चित. मात्र त्याच वेळी दुसऱ्या बाजूला भारताचे टी-२०तील तारे आफ्रिकेशी दोन हात करण्यास सज्ज होत आहे. कसोटी मालिकेतील फक्त अक्षर पटेल भारताच्या टी-२० संघाचाही भाग आहे. तर अन्य १४ खेळाडू विश्रातीनंतर पुन्हा मैदान गाजवण्यासाठी आतुर असतील.

या मालिकेसाठी विजयकुमार वैशाख व रमणदीप सिंग यांना प्रथमच संधी देण्यात आली आहे. मयांक यादव व शिवम दुबे दुखापतीमुळे निवडीस उपलब्ध नव्हते. तसेच रियान पराग बंगळुरू येथे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत उपचार घेत असल्याने तो आफ्रिका दौऱ्यावर जाणार नाही. अशा स्थितीत अभिषेक शर्माच्या साथीने संजू सॅमसन सलामीला येणार आहे. सूर्यकुमार, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या मधल्या फळीची धुरा वाहतील. गोलंदाजीचा विचार करता अर्शदीप सिंग भारतीय माऱ्याचे नेतृत्व करेल. ३ वर्षांनी भारतीय संघात परतलेला फिरकीपटू वरुण चक्रवर्ती, अक्षर फिरकीची बाजू सांभाळतील. रमणदीपला शुक्रवारी पदार्पणाची संधी मिळू शकते. बांगलादेशविरुद्धची टी-२० मालिका भारताने ३-० अशा फरकाने जिंकली. मात्र आता आफ्रिकेच्या खेळपट्ट्यांवर त्यांची चाचपणी होईल.

दुसरीकडे काही महिन्यांपूर्वी भारताविरुद्धच टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पराभव पत्करल्यानंतर आफ्रिका नव्याने सुरुवात करण्यास आतुर आहे. एडीन मार्करमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघात हेनरिच क्लासेन, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर असे धडाकेबाज फलंदाज व मार्को यान्सेन, जेराल्ड कोएट्झे असे गोलंदाज आहेत.

प्रतिस्पर्धी संघ

भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार वैशाख, आवेश खान, यश दयाल.

दक्षिण आफ्रिका : एडीन मार्करम (कर्णधार), ओटनिल बार्टमन, जेराल्ड कोएट्झे, डोनोवन फरेरा, रीझा हेंड्रिक्स, मार्को यान्सेन, हेनरिच क्लासेन, पॅट्रिक क्रुगर, केशव महाराज, डेव्हिड मिलर, मिहलाली एमपोंग्वाना, नकाबायोम्झी पीटर, रायन रिकेलटन, अँडीले सिमलेन, ट्रिस्टन स्टब्स.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी