लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेला अँडरसन- तेंडुलकर ट्रॉफी असे नाव दिले आहे. एखाद्या ट्रॉफीवर जगातील महान क्रिकेटपटूसोबत आपले नाव आल्याने मला अवघडल्यासारखे वाटत आहे. मात्र हा माझा सन्मान असल्याचे, इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन म्हणाला.
एखाद्या ट्रॉफीवर आपले नाव असणे हेच मोठे नाही, तर सचिन तेंडुलकरच्या नावासोबत येणे हा सन्मान आहे. सचिन हा माझ्यासाठी महान क्रिकेटपटू आहे.
जेव्हा मी सचिनसोबत ट्रॉफीजवळ उभा असतो, तेव्हा मला पूर्णपणे वेगळे वाटते. मी सचिनकडे खूप मोठ्या सन्मानाने पाहतो, असे अँडरसन म्हणाला.
अँडरसन आणि तेंडुलकर दोघेही सर्वकालीन महान खेळाडू म्हणून ओळखले जातात. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक सामने खेळणाऱ्यांमध्ये त्यांची नावे आहेत. तेंडुलकरने २०० कसोटी सामने खेळले आहेत. तर अँडरसनने १८८ कसोटीत इंग्लंडच्या संघाने प्रतिनिधीत्व केले आहे.