क्रीडा

श्रीलंकेच्या प्रशिक्षकपदावरून जयसूर्या होणार पायउतार

टी-२० विश्वचषकातील आव्हान सुपर-आठ फेरीत संपुष्टात आल्यानंतर सनथ जयसूर्याने श्रीलंकेच्या प्रशिक्षकपदावरून पायउतार होण्याचे ठरवले आहे.

Swapnil S

कोलंबो : टी-२० विश्वचषकातील आव्हान सुपर-आठ फेरीत संपुष्टात आल्यानंतर सनथ जयसूर्याने श्रीलंकेच्या प्रशिक्षकपदावरून पायउतार होण्याचे ठरवले आहे.

“आम्ही चाहत्यांच्या अपेक्षांची पूतर्ता करू शकलो नाही. मायदेशात विश्वचषक खेळत असूनही आम्हाला उपांत्य फेरी गाठण्यात अपयश आले. माझा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ जूनपर्यंत होता. मात्र मी त्यापूर्वी श्रीलंकन क्रिकेट मंडळाकडे माझा राजीनामा सुपूर्द करणार आहे,” असे जयसूर्या पाकिस्तानविरुद्धच्या लढतीनंतर म्हणाला. श्रीलंकेने साखळी फेरीत ४ पैकी ३ सामने जिंकून सुपर-आठ फेरी गाठली होती. मात्र तेथे त्यांना इंग्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला.

स्मॅक क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन सोहळा दिमाखात पार पडला. यावेळी डीवायएसपी वैष्णवी पाटील यांचा स्मॅक चेअरमन जयदीप चौगले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सुरेंद्र जैन, कोल्हापूर चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे, मॅक अध्यक्ष मोहन कुशिरे, इंजिनिअरिंग असोसिएशनचे संचालक बाबासो कोंडेकर, नगरसेविका पूजा पोवार, स्पर्धेचे प्रायोजक विजय सोमानी तसेच स्मॅकचे निमंत्रित सदस्य, उद्योजक व आयोजन समिती सदस्य उपस्थित होते.

"६ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा, अनावश्यक प्रवास टाळा"; मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना आवाहन

Telegram ला केंद्र सरकारची नोटीस; बेकायदेशीर चित्रपट आणि ओटीटी कंटेंटवर कारवाईचे निर्देश

Mumbai Rain : पावसाचा जोर कायम; मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत

Mumbai Rain : मुसळधार पावसाने मुंबईची दाणादाण; अनेक भाग जलमय, वसई-विरारलाही फटका, Video

जोगेश्वरीत भरधाव टँकरने डिलिव्हरी बॉयला चिरडलं; पळ काढणाऱ्या चालकाला नागरिकांनी केलं पोलिसांच्या हवाली, Video