सात्विक-चिराग उपांत्य फेरीत पराभूत; इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा X-@satwiksairaj
क्रीडा

सात्विक-चिराग उपांत्य फेरीत पराभूत; इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा

सात्विक साइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीला शनिवारी इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला.

Swapnil S

नवी दिल्ली : सात्विक साइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीला शनिवारी इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला. त्यामुळे भारताचेही स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

नवी दिल्ली येथील खाशाबा जाधव क्रीडा संकुलात सुरू असलेल्या तसेच ७५० सुपर गुणांचा दर्जा असलेल्या या स्पर्धेत सात्विक-चिरागच्या रूपात एकमेव भारतीय जोडी शिल्लक होती. मात्र पुरुष दुहेरीच्या उपांत्य सामन्यात जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या मलेशियाच्या गोह फेई आणि नूर इझुद्दीन यांनी सात्विक-चिरागला २१-१८, २१-१४ अशी सहज धूळ चारली. सात्विक-चिरागने ३७ मिनिटांतच ही लढत गमावली. गतवर्षीसुद्धा सात्विक-चिरागला उपांत्य फेरीतच पराभव पत्करावा लागला होता.

दरम्यान, शुक्रवारी महिला एकेरीत इंडोनेशियाच्या जॉर्जिया मारिस्काने सिंधूला २१-९, १९-२१, २१-१७ असे पराभूत केले. तसेच पुरुष एकेरीत चीनच्या हाँग वेंगने किरणला २१-१३, २१-१९ असे नेस्तनाबूत केले. त्यामुळे भारताचे एकेरीतील अभियान संपुष्टात आले होते. आता पुढील आठवड्यात जकार्ता येथे इंडोनेशिया ओपन स्पर्धा सुरू होईल. तेथे भारतीय खेळाडूंकडून चमकदार कामगिरी अपेक्षित आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी निराशा केली होती.

सोन्या-चांदीवरील आयात शुल्क दुप्पट; रुपया सावरण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय

एकच मंत्र-काटकसर! मोदींच्या ताफ्यात आता फक्त दोन मोटारी, राज्यातील मंत्र्यांचे ताफे निम्म्यावर

अधिकाऱ्यांचे परदेश दौरे रद्द, मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्णय

नीट पेपरफुटीः पुण्यातून महिलेसह पाच ताब्यात; कोचिंग क्लासेस, डॉक्टर्स यांचाही सहभाग?

मतीन पटेलच्या घरावर बुलडोझर; नाशिक टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला आश्रय देणे भोवले