डी. गुकेश,डिंग लिरेन (डावीकडून) 
क्रीडा

चौथ्या फेरीत बरोबरीवर समाधान; गुकेश-लिरेन यांच्या खात्यात प्रत्येकी २ गुण

भारताचा १८ वर्षीय युवा ग्रँडमास्टर डी. गुकेश आणि चीनचा विद्यमान जगज्जेता डिंग लिरेन यांच्यातील जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीची चौथी फेरी बरोबरीत सुटली. त्यामुळे चौथ्या फेरीअखेर दोन्ही खेळाडूंच्या खात्यात प्रत्येकी २ गुण आहेत. शनिवारी पाचवी फेरी रंगणार आहे.

Swapnil S

सिंगापूर : भारताचा १८ वर्षीय युवा ग्रँडमास्टर डी. गुकेश आणि चीनचा विद्यमान जगज्जेता डिंग लिरेन यांच्यातील जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीची चौथी फेरी बरोबरीत सुटली. त्यामुळे चौथ्या फेरीअखेर दोन्ही खेळाडूंच्या खात्यात प्रत्येकी २ गुण आहेत. शनिवारी पाचवी फेरी रंगणार आहे.

सोमवारपासून सुरू झालेल्या या लढतीत पहिल्या फेरीत गुकेशला पराभवाचा धक्का बसला होता. मात्र दुसऱ्या फेरीत गुकेशने लिरेनला बरोबरीत रोखले. तिसऱ्या फेरीतील विजयासह गुकेशने त्याच्यातील कौशल्य दाखवून दिले आहे. गुरुवारी विश्रांतीचा दिवस होता. त्यानंतर शुक्रवारी ४२ चालींपर्यंत दोन्ही खेळाडूंमध्ये झुंज पाहायला मिळाली. अखेर दोघांना अर्धा गुण बहाल करण्यात आला. भारतीय वेळेनुसार दुपारी २.३० वाजता सामन्याला सुरुवात होते.

जागतिक अजिंक्यपदाच्या लढतीत एकूण १४ पारंपरिक (क्लासिकल) डाव होतील. सर्वप्रथम ७.५ गुणांचा टप्पा गाठणारा खेळाडू विजेता ठरेल आणि जगज्जेतेपद मिळवेल. पहिल्या ४० चालींसाठी १२० मिनिटे, पुढील २० चालींसाठी ६० मिनिटे आणि उर्वरित चालींसाठी १५ मिनिटांचा कालावधी खेळाडूंना उपलब्ध असेल. काळ्या मोहऱ्यांनी खेळाडूच्या ४० चाली होत नाहीत, तोवर सामना बरोबरीत सोडवता येणार नाही. तसेच १४ डावांअंती लढतीत बरोबरी असल्यास विजेता ठरवण्यासाठी जलद प्रकारात ‘टायब्रेकर’ खेळवण्यात येईल. सोमवारी होणाऱ्या पहिल्या डावात गुकेशला पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळण्याची संधी मिळणार आहे. तीन डावांनंतर राखीव दिवस असेल.

डिंगने गतवर्षी रशियाच्या इयन नेपोम्नियाशीला पराभूत करून बुद्धिबळाच्या विश्वातील पहिला चिनी जगज्जेता म्हणून मिरवण्याचा मान मिळवला होता. मात्र, त्यानंतर त्याची कामगिरी खालावली आहे. तसेच त्याला नैराश्यालाही सामोरे जावे लागले. त्यामुळे यंदाच्या लढतीत गुकेशचे पारडे जड असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे. भारताकडून आतापर्यंत केवळ विश्वनाथन आनंदने जगज्जेतेपदावर मोहोर उमटवली आहे. गेल्या काही वर्षांपासून आनंदच्या मार्गदर्शनाखालीच गुकेश सराव करत आहे. त्यामुळे आपल्या गुरुच्या पावलावर पाऊल ठेवण्याची संधी गुकेशकडे आहे.

आनंदवार्ता! केरळमध्ये मान्सून दाखल; मुंबईत कधी बरसणार?

Mumbai : गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाला वेग; जुळ्या बोगद्यांसाठी TBM यंत्रणा उभारणी अंतिम टप्प्यात

'सॉरी आई बाबा... मी सगळं उद्ध्वस्त केलं’; NEET परीक्षार्थी विद्यार्थिनीची आत्महत्या, सुसाइड नोटमुळे हळहळ

Mumbai : एअर इंडियाची इमारत १५ ऑगस्टपासून सेवेत रुजू

पुणे विषारी दारू प्रकरणात नवी मुंबईतील बाप-लेक अटकेत; घातक रसायने पुरविल्याचे उघड, आतापर्यंत ३३३ जणांवर कारवाई