क्रीडा

श्रेयसकडे मुंबईच्या संघाचे नेतृत्व; सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेसाठी संघाची घोषणा

२३ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर दरम्यान खेळल्या जाणाऱ्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेसाठी श्रेयस अय्यरकडे मुंबईच्या १७ सदस्यीय संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. पृथ्वी शॉलाही या संघात संधी देण्यात आली आहे. रविवारी मुंबईच्या या संघाची घोषणा करण्यात आली.

Swapnil S

मुंबई : २३ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर दरम्यान खेळल्या जाणाऱ्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेसाठी श्रेयस अय्यरकडे मुंबईच्या १७ सदस्यीय संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. पृथ्वी शॉलाही या संघात संधी देण्यात आली आहे. रविवारी मुंबईच्या या संघाची घोषणा करण्यात आली.

अनुभवी अजिंक्य रहाणेलाही मुंबईच्या संघात संधी देण्यात आली आहे. सध्या सुरू असलेल्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत रहाणे मुंबईच्या संघाचे कर्णधारपद भूषवत आहे. सिद्धेश लाडलाही या संघात संधी देण्यात आली आहे.

श्रेयस अय्यर हा सध्या रणजी ट्रॉफीच्या मोसमात चांगलाच फॉर्मात आहे. त्याने ९०.४०च्या सरासरीने ४५२ धावा केल्या आहेत. त्यात दोन शतकांचा समावेश आहे.

श्रेयस अय्यरने यंदाच्या हंगामात भरपूर धावा जमवल्या आहेत. त्याने ओडिशा विरुद्ध २२८ चेंडूंत २३३ धावा चोपल्या आहेत. महाराष्ट्र विरुद्ध खेळताना १९० चेंडूंचा सामना करताना त्याने १४२ धावा जमवल्या होत्या. त्यामुळे मुंबईने या दोन्ही सामन्यांत मोठा विजय मिळवला आहे. श्रेयस अय्यरचा फॉर्म मुंबईच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

फिटनेस आणि शिस्तीशी संबंधित कारणांमुळे युवा फलंदाज पृथ्वी शॉला रणजी ट्रॉफी स्पर्धेत मुंबईच्या संघातून वगळण्यात आले आहे. मात्र सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत त्याला संघात संधी मिळाली आहे. अष्टपैलू तनुष कोटीयन, शार्दुल ठाकूर यांचाही या संघात समावेश करण्यात आला आहे. अंगक्रिश रघुवंशी, जय बिश्त हे खेळाडूही या १७ सदस्यीय मुंबईच्या संघाचा भाग आहेत.

मुंबईचा संघ : श्रेयस अय्यर (कर्णधार), पृथ्वी शॉ, अंगक्रिश रघुवंशी, जय बिश्त, अजिंक्य रहाणे, सिद्धेश लाड, सूर्यांश शेडगे, साईराज पाटील, हार्दिक तामोरे (यष्टीरक्षक), आकाश आनंद (यष्टीरक्षक), शम्स मुलानी, हिमांशू सिंग, तनुष कोटीयन, शार्दुल ठाकूर, मोहित अवस्थी, रॉयस्टॉन डायस, जुनेद खान.

Maratha Reservation : सलग तिसऱ्या दिवशी वाहतूक विस्कळीत; CSMT परिसरात आंदोलकांचे बस्तान

Maratha Reservation: आंदोलनाची धग वाढणार; मनोज जरांगे आजपासून पाणी पिणेही बंद करणार; एकतर विजययात्रा, नाहीतर अंत्ययात्रा

Maratha Reservation : दक्षिण मुंबईत आज पुन्हा कोंडीची शक्यता

Maratha Reservation : CSMT परिसरात अस्वच्छता; राज्यभरातून अन्नपदार्थांचा ओघ वाढल्याने नासाडी

Maratha reservation protest : सुप्रिया सुळेंना आंदोलकांचा घेराव; गाडीवर बाटल्या भिरकावल्या