क्रीडा

सिंगापूर ओपनच्या अंतिम सामन्यात सिंधूने पटकाविले विजेतेपद, चीनच्या वांग झी यी हिला केले पराभूत

वृत्तसंस्था

भारताची दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधूने रविवारी सिंगापूर ओपनच्या अंतिम सामन्यात चीनच्या वांग झी यी हिला २१-९, ११-२१, २१-१५ ने पराभूत करत विजेतेपद पटकाविले.

सिंधूने सामन्याची सुरुवातच आत्मविश्वासपूर्ण केली. सिंधूने अप्रतिम खेळ करताना पहिल्याच सेटमध्ये सामन्यावर आपले वर्चस्व निर्माण केले. पहिल्या सेटमध्ये तिने चीनच्या शटलरचा २१-९ अशा मोठ्या फरकाने पराभव केला. दुसऱ्या सेटमध्ये वांग झी यीने शानदार पुनरागमन करत सिंधूचा २१-११ असा पराभव केला; पण दुसऱ्या सेटमध्ये वांग झी यीने कडवी झुंज दिली. तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात दोन्ही खेळाडूंमध्ये निकराची झुंज झाली. अंतिम सेटमध्ये सिंधूने मुसंडी मारली. सातव्या मानांकित सिंधूने अकराव्या मानांकित वांग झी यीचा ५८ मिनिटांच्या लढतीनंतर पराभव केला. अंतिम गेम २१-१५ असा जिंकून विजेतेपद पटकाविले. त्याआधी, सिंधूने उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या साएना कावाकामीचा पराभव करताना हा सामना २१-१५, २१-७ असा सरळ सेटमध्ये जिंकला होता. यावर्षी सिंधूने सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि स्विस ओपन अशी दोन सुपर ३०० पदके जिंकली आहेत. त्यानंतर सिंगापूर ओपनचे तिसरे पदकही तिने पटकाविले. दरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंधूचे अभिनंदन करताना ट्विटमध्ये म्हटले आहे की, सिंधूने पुन्हा एकदा आपली मान अभिमानाने उंचावली आहे. सिंगापूर ओपनचे पदक जिंकल्याबद्दल सिंधूचे खूप अभिनंदन.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सोलापूर आणि पुण्यात सभा; 'हे' रस्ते वाहतुकीसाठी असणार बंद

महाराष्ट्रातील राजकारण भरकटत आहे!

नद्या आ वासताहेत...

काँग्रेसला मोठा धक्का! अरविंदर सिंग लवली यांचा दिल्लीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा; 'आप'सोबत युती केल्यामुळे नाराज

सरसंघचालक मोहन भागवत यांचे आरक्षणाच्या मुद्यावरून स्पष्टीकरण; "जोपर्यंत आरक्षणाची गरज..."