क्रीडा

बॅडमिंटन ओपनच्या अंतिम फेरीत सिंधूची धडक

सिंधूने जागतिक क्रमवारीत ३८व्या क्रमांकावर असलेल्या कावाकामीवर मिळवलेला हा सलग तिसरा विजय ठरला

वृत्तसंस्था

दोन वेळा ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या भारताच्या पी. व्ही. सिंधूने सिंगापूर बॅडमिंटन ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारली. सिंधूने उपांत्य फेरीत जपानच्या साएना कावाकामीचा सरळ गेममध्ये २१-१५, २१-७ असा पराभव केला. या हंगामात सिंधूने सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि स्विस ओपन अशी दोन सुपर ३०० स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले आहे.

सिंधूने जागतिक क्रमवारीत ३८व्या क्रमांकावर असलेल्या कावाकामीवर मिळवलेला हा सलग तिसरा विजय ठरला. आता अंतिम फेरीत तिची लढत जपानच्या एया ओहोरी आणि चीनच्या वांग झी यी यांच्यातील विजेत्याशी होणार आहे.

कावाकामी विरुद्धच्या हेड टू हेडमध्ये सिंधू २-० ने आघाडीवर होती. कावाकामी सोबत ती २०१८ मध्ये चायना ओपनमध्ये खेळली होती. कावाकामीने २०१९मध्ये ऑरलान्स मास्टर स्पर्धा जिंकली होती, तर स्विस ओपनमध्ये अंतिम फेरीत धडक मारली होती.

हैदराबादच्या २७ वर्षीय सिंधूने या वर्षीच्या एशियन चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदकाची देखील कमाई केली होती. आता ती २०२२मध्ये आपल्या पहिल्यावहिल्या सुपर ५००० विजेतेपदाच्या अगदी जवळ पोहोचली आहे.

मराठा आरक्षणाविरोधात भुजबळ जाणार कोर्टात; दोन दिवसांत मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करणार

जरांगेंचा पुन्हा इशारा; कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया १७ सप्टेंबरपूर्वी सुरू करा!

घेतलेला अन्याय्य जीएसटी परत करा

श्रेय-अपश्रेयापलीकडचा ‘सारथी’

आजचे राशिभविष्य, ९ सप्टेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत