इटलीचा अग्रमानांकित जॅनिक सिनेर, अमेरिकेचा बेन शेल्टन, पोलंडची इगा स्विआटेक आणि अमेरिकेची मॅडीसन कीझ यांनी बुधवारी ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.  
क्रीडा

ऑस्ट्रेलियन ओपन : सिनेर, शेल्टन, स्विआटेक, कीझ यांचा उपांत्य फेरीत प्रवेश

इटलीचा अग्रमानांकित जॅनिक सिनेर, अमेरिकेचा बेन शेल्टन, पोलंडची इगा स्विआटेक आणि अमेरिकेची मॅडीसन कीझ यांनी बुधवारी ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.

Swapnil S

मेलबर्न : इटलीचा अग्रमानांकित जॅनिक सिनेर, अमेरिकेचा बेन शेल्टन, पोलंडची इगा स्विआटेक आणि अमेरिकेची मॅडीसन कीझ यांनी बुधवारी ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. आता गुरुवारी महिला एकेरीतील उपांत्य सामने होतील, तर शुक्रवारी पुरुष एकेरीच्या उपांत्य लढती खेळवण्यात येतील.

वर्षातील पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेल्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये रॉड लेव्हर एरिनावर झालेल्या पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात गतविजेत्या सिनेरने ऑस्ट्रेलियाच्या आठव्या मानांकित ॲलेक्स डीमिनॉरला ६-३, ६-२, ६-१ अशी धूळ चारली. सलग दोन स्पर्धांमध्ये उपांत्य फेरी गाठणारा सिनेर हा इटलीचा पहिलाच खेळाडू ठरला. दुसऱ्या लढतीत २१व्या मानांकित शेल्टनने इटलीच्या लॉरेंझो सोनेगोला ६-४, ७-५, ४-६, ७-६ (७-४) असे चार सेटमध्ये पराभूत केले. आता उपांत्य सामन्यात शेल्टनसमोर सिनेरचे कडवे आव्हान असेल. अन्य उपांत्य लढतीत नोव्हाक जोकोव्हिच आणि अलेक्झांडर झ्वेरेव्ह आमनेसामने येतील.

महिला एकेरीत दुसऱ्या मानांकित स्विआटेकने आठव्या मानांकित एमा नवारोला ६-१, ६-२ असे नेस्तनाबूत केले. १९व्या मानांकित कीझने २८व्या मानांकित एलिना स्विटोलिनाला ३-६, ६-३, ६-४ असे पिछाडीवरून पराभूत केले. कीझ आणि स्विआटेक गुरुवारी उपांत्य फेरीत खेळतील. अन्य उपांत्य सामना गतविजेती आर्यना सबालेंका आणि स्पेनची ११वी मानांकित पावलो बडोसा यांच्यात होईल.

दरम्यान, मंगळवारी भारताचा अनुभवी टेनिसपटू रोहन बोपण्णा आणि त्याची चीनी सहकारी झेंग शुआई यांना मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात पराभव पत्करावा लागला.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक