क्रीडा

... तर कोहली दबावाखाली येईल; ग्लेन मॅकग्राचा इशारा

भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीला लक्ष्य करण्यासाठी ऑस्ट्रेलियाकडे तोडीचे गोलंदाज आहेत. पर्थमध्ये २२ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेतील पहिल्या सामन्यात जर विराट धावा जमवण्यात अपयशी ठरला तर तो दबावाखाली येईल, असे ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्राला वाटते.

Swapnil S

मेलबर्न : भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीला लक्ष्य करण्यासाठी ऑस्ट्रेलियाकडे तोडीचे गोलंदाज आहेत. पर्थमध्ये २२ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेतील पहिल्या सामन्यात जर विराट धावा जमवण्यात अपयशी ठरला तर तो दबावाखाली येईल, असे ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्राला वाटते.

भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध गेल्या ४ कसोटी मालिका जिंकल्या आहेत. असे असले तरी घरच्या मालिकेत न्यूझीलंडविरुद्ध भारताचा ०-३ असा लाजिरवाणा पराभव झाला आहे. त्या मालिकेनंतर भारतीय संघ ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.

भारतीय संघाला न्यूझीलंडने व्हॉईटवॉश दिला आहे. तसेच त्या संघाला दबावाखाली टाकण्यासाठी तुमच्याकडे त्या तोडीचे गोलंदाज आहेत. त्यामुळे त्यांच्यावर दबाव टाका. हा दबाव झेलण्याची ताकद त्यांच्यात आहे का ते पाहा, असे मॅकग्रा म्हणाला.

कोहली हा भारतीय संघाचा भरवशाचा फलंदाज आहे. मात्र सध्या तो कसोटी क्रिकेटमध्ये धावांसाठी झगडत आहे. यंदाच्या वर्षात तो सहा कसोटी सामने खेळला. त्यात त्याची सरासरी केवळ २२.७२ इतकीच आहे.

दुखापतग्रस्त शुभमन गिल पहिल्या सामन्यातून बाहेर जाण्याची शक्यता आहे. तसेच कर्णधार रोहित शर्माही पहिल्या कसोटीत खेळण्याबाबत संभ्रम आहे. त्यामुळे फलंदाजीचे नेतृत्व करताना कोहली दबावाखाली असेल, असे मॅकग्रा म्हणाला.

कोहलीने ऑस्ट्रेलियात चांगली कामगिरी केली आहे. चार ऑस्ट्रेलिया दौऱ्यांमध्ये कोहलीने ५४.०८ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. मॅकग्रा म्हणाला की, कोहलीला लक्ष्य केले तरी त्यातून निघण्याची क्षमता त्याच्यात आहे. मला वाटते की तो खूप भावनिक खेळाडू आहे. जेव्हा तो अनफॉर्ममध्ये असतो तेव्हा त्याला संघर्ष करावा लागतो, असे मॅकग्रा पुढे म्हणाला.

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

सांगलीत खताच्या कारखान्यात वायू गळती; तीन ठार, ९ जण रुग्णालयात

लोकलमधील बसण्याच्या वादातून तरुणाचा खून

अदानी पुन्हा गोत्यात; सौरऊर्जा कंत्राट मिळविण्यासाठी दिली 2000 कोटींची लाच, अमेरिकेतील कोर्टात आरोप